अनिल संतोषवारांची पुर्नरावृर्ती होणार काय?
मूल (प्रतिनिधी) : 2 डिसेंबर रोजी होवु घातलेल्या मूल नगर पालीकेच्या निवडणुकीत माजी उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रभाग क्रं. 6 अ गटातुन उमेदवारी दिलेली आहे. नंदकिशोर रणदिवे यांनी केलेल्या विकासात्मक कामांमुळे त्यांचा वार्डात चांगलाच बोलबाला आहे. परंतु भाजपातील काही कार्यकर्ते नंदकिशोर रणदिवे यांच्या परावभावासाठी पुढाकार घेत असल्याची चर्चा वार्डात सुरू आहे. यामुळे अनिल संतोषवार यांची पुर्नरावृती परत होणार की काय असा प्रश्न सध्या चर्चीला जात आहे. Nandkishor Randive
मूल नगर पालीकेतील प्रभाग क्रं. 6 अ गट हे नागरीकांचा मागास प्रवर्ग पुरूष गटासाठी राखीव आहे, यागटातुन माजी उपाध्यक्ष नदकिशोर रणदिवे यांना भारतीय जनता पार्टीकडुन उमेदवारी जाहिर केलेली आहे. उपाध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांनी वार्डातील अपुर्ण कामे पुर्ण करण्यासाठी पुरेपुर प्रयत्न केलेले आहे. सतत वार्डातील नागरीकांच्या संपर्कात राहात असल्यामुळे ते नागरीकांचे चाहते बनले, यामुळे त्यांनी प्रभाग क्रं. 6 मधुन नगर पालीका निवडणुक लढविण्यासाठी पुढाकार घेतला मात्र भाजपाचे काही कार्यकर्ते त्यांच्या पराभवासाठी पुढे-पुढे करीत असल्याची चर्चा आहे. नंदकिशोर रणदिवे हे मूल नगर पालीकेचे माजी उपाध्यक्ष आहेत, ते निवडुण आल्यास परत उपाध्यक्षपदी त्यांची वर्णी लागु शकतो यामुळे त्यांचा पराभव करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची चर्चा आहे. 2016 मध्ये पार पडलेल्या मूल नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रं. 2 मधुन माजी उपाध्यक्ष अनिल संतोषवार यांचा पराभव झाला, केवळ एकाच भाजपाच्या उमेदवाराचा त्यावेळी पराभव झाला, त्याचा ठपका भाजपाच्या काही कार्यकर्त्यांवर ठेवल्याची चर्चा होती, त्याची पुर्नरावृती होणार तर नाही ना अशीही चर्चा आता प्रभागात सुरू आहे. BJP candidate
प्रभाग क्रं. 6 चे उमेदवार नंदकिशोर रणदिवे हे आमदार सुधीर मुनगंटीवार याचे कट्टर समर्थक असुन नंदकिशोर रणदिवे यांना निवडुण आणण्यासाठी आमदार मुनगंटीवार शर्तीने प्रयत्न करणार आहेत, मात्र काही कार्यकर्त्यांकडुन पराभवासाठी प्रयत्न चालविल्याची चर्चा होत असल्याने स्वतः मुनगंटीवार यांना याकडे विशेष लक्ष देणे तितकेच महत्वाचे मानले जात आहे. Municipal Council Election









