मूल नगर पालीका निवडणुकीत जनशक्ती विरूध्द धनशक्तीची लढत

Samarth-Kapgate
Samarth-Kapgate

मूल नगर पालीका निवडणुक

मूल (प्रतिनिधी) : मूल नगर पालीकेच्या निवडणुकीच्या तोंडावर नगराध्यक्षपदासाठी एकच चर्चा आता जोर करीत आहे, जनशक्ती विरूध्द धनशक्ती अशी लढत होत असल्याने मूल शहरात पैसा बोलता है अशीच चर्चा आता जोरात सुरू आहे. मात्र जनशक्ती कॉंग्रेसच्या पारड्यात  असल्याने निवडणुकीची रंगत अधिकच रंगतदार होणार असे चिन्ह सद्यतरी दिसत आहे. Congress-BJP

मूल नगर पालीकेच्या निवडणुकीत राष्ट्रीय कॉंग्रेस पार्टीकडुन नगराध्यक्षपदासाठी एकता प्रशांत समर्थ हा उमेदवार म्हणुन रिंगणात आहे तर भाजपाकडुन प्रा. किरण किशोर कापगते निवडणुक लढवित आहे. माजी बांधकाम सभापती प्रशांत समर्थ यांनी आपल्या अर्धांगिनीला यानिवडणुकीत जनतेच्या केलेल्या कामाच्या आधारे नगराध्यक्षपदासाठी निवडणुक रिंगणात उभे केलेले आहेत. रात्रौबेरात्रौ त्यांनी मूल शहरातील जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतात, त्यांनी जनतेच्या सेवेसाठी कधीही भेदभाव केलेला नाही, यामुळे त्यांच्याबाजुने मोठा जनाधार दिसत आहे, तर भाजपाच्या उमेदवार किरण कापगते हया सावली येथील एका महाविद्यालयात प्राध्यापक आहेत, त्यांचा बहुतांष वेळ महाविद्यालयात जातो, दरम्यान  भाजपाच्या उमेदवारांनी प्रचारातही आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या विकासकामांचा बोलबाला करून निवडुण देण्याचे आवाहन करीत आहे. परंतु स्वतःचे कार्य काय? यावर मात्र ब्र सुध्दा काढत नसल्याचे दिसत आहे. Ekta Samarth-Kiran Kapgate

मूल शहरातील जनतेला वेळ देणारा नगराध्यक्षाची गरज आहे, अशी अपेक्षा सुध्दा मतदारांना आहे, प्रा. किरण कापगते या निवडुण आल्यास खरचं नागरीकांना वेळ देतील काय? असा प्रश्नही मतदारांमध्ये चर्चीला जात आहे.