एकता समर्थ यांना जनतेचा वाढता पाठींबा
मूल (प्रतिनिधी) : मूल नगर पालीकेच्या नगराध्यक्ष पदाच्या कॉंग्रेसच्या उमेदवार एकता प्रशांत समर्थ यांच्या दमदार एंट्रीने मतदारांच्या मनात घर केलेल्या आहेत, वार्डावार्डात मतदारांचा त्यांना भरघोष पाठींबा मिळत असल्याने त्या नगराध्यक्ष म्हणुन निवडुण येण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे. Mul Municipal Council
नगर पालीकेचे माजी बांधकाम सभापती प्रशांत समर्थ यांनी शेकडो कार्यकर्त्यासह कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला, यावेळी त्यांची अर्धागिनी एकता प्रशांत समर्थ यांना कॉंग्रेस पक्षाकडुन नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहिर करून मूल नगर पालीकेवर कॉंग्रेसचा झेंडा फडकविण्यासाठी एकजुटीने कामाला लागण्याचे आवाहन ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले, त्याच जिद्दीने कॉंग्रेस पक्षाने निवडणुक कामाला लागले, भाजपाकडुन शेवटच्या क्षणी प्रा. किरण किशोर कापगते यांची उमेदवारी जाहीर केली, उमेदवारीसाठी अनेक निष्ठावंत कार्यकर्ते प्रयत्नरत होते मात्र सर्वांची नाराजी दुर करून भारतीय जनता पार्टींच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करण्याचे आवाहन क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. MLA Mungantiwar
मूल नगर पालीकेच्या 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत मतदारांनी भाजपाकडे एकहाती सत्ता दिली, मात्र यावेळी वेगळे चित्र बघायला मिळेल अशी चर्चा आता मतदारांमध्ये असुन कॉंग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार एकता समर्थ यांची बाजु सध्यातरी भक्कम दिसून येत आहे. MLA Wadettiwar









