पाईप लाईनच्या गळतीमुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय Water wastage

Water wastage
Water wastage

पाईप लाईन दुरूस्ती करण्याची नंदकिशोर रणदिवे यांची मागणी

मूल (प्रतिनिधी) : जलशुध्दीकरण केंद्रातून पाणी टाकीमध्ये जाणारी पाईप लाईऩमध्ये गळती असल्यामुळे रोज हजारो लिटर पाण्याची गळती होत असतांनाही नगर पालीका त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मूल नगर पालीकेचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे यांनी केला असुन तात्काळ पाईप लाईन दुरूस्ती करण्याची मागणी त्यांनी केली आहे. Mul Municipal Council

मूल शहराला स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने करोडो रूपये खर्च करून पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. वैनगंगा नदीमधुन मूल येथील जलशुध्दीकरण केंद्रात पाणी पुरवठा केला जातो, पाणी पुरवठा केल्यानंतर मूल येथील वेगवेगळया पाणी टाकीमध्ये पाणी पुरवठा केला जात आहे. दरम्यान मूल बस स्थानकाजवळील मुख्य पाईप लाईन मध्ये गळती असल्यामुळे रोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे, मात्र नगर पालीका त्याकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही नंदकिशोर रणदिवे यांनी केला आहे. Water wastage

नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी पदभार घेवुन महिणा सुध्दा लोटला नाही, तर काही दिवसांपुर्वी सभापती पदाची निवडणुक अविरोध पार पडली. नवनियुक्त पदाधिकारी, नगरसेवक शहरवासीयांना स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठा करतील अशी अपेक्षा नागरिकांना होती, परंतु काही दिवसातच अपेक्षाभंग होत असल्याची बोंब सुरू आहे. पाणी गळतीची समस्या कायमस्वरूपी दुर करून शहरवासीयांना स्वच्छ आणी मुबलक पाणी पुरवठा करण्याची मागणी श्री. रणदिवे यांनी केली आहे. Nandkishor Randive

पाईप लाईन गळतीचे काम लवकरच पुर्ण करू: विलास कागदेलवार
मूल शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या  पाईप लाईन मध्ये अनेक ठिकाणी गळती होत आहे, बस स्थानकाजवळच्या पाईप लाईन मध्येही मोठी गळती होत असल्याने पाणी टाकी भरायला वेळ लागत आहे, याबाबत पाणी पुरवठा समितीच्या बैठकीत चर्चा झाली असुन लवकरच पाईप लाईन गळतीचे काम पुर्ण करण्यात येईल अशी प्रतिक्रिया मूल नगर पालीकेचे पाणी पुरवठा समितीचे सभापती विलास कागदेलवार यांनी दिली. Vilas Kagdelwar