संस्थेवर लावलेली आरोप बिनबुळाचे : अध्यक्ष निपचंद शेरकी Rayat Urban Cooperative Credit Society

Rayat Urban Cooperative Credit Society
Rayat Urban Cooperative Credit Society

पत्रकार परिषदेत केले मत व्यक्त

मूल (प्रतिनिधी) : येथील रयत नागरी सहकारी पत संस्थेची प्रगती पाहुन काही माजी संचालकांच्या डोळात खुपत आहे, त्यांच्याकडुन संस्थेची नाहक बदनामी करण्याचा प्रकार सुरू आहे. संस्थेवर लावलेले आरोप बिनबुळाचे असल्याचे मत संस्थेचे अध्यक्ष निपचंद शेरकी यांनी पत्रकार परिषदेत दिली. Nipchand Sherki

मूल येथील पत्रकार भवनामध्ये आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना संस्थेचे अध्यक्ष निपचंद शेरकी यांनी म्हटले की, संस्थेचे काही निष्कासीत सभासदानी संस्थेवर खोटे आरोप लावलेले आहे. संस्था गेल्या 10 वर्षापासुन ऑडीट वर्ग ‘अ’ मध्ये आहे. त्यासोबतच संस्थेच्या उल्लेखनिय कार्याबद्दल राज्य फेडरेशनकडुन प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. Mul

थकीत वसुलीची कार्यवाही संस्थेमार्फत सुरू केल्यामुळे सुळबुध्दीने संस्थेची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू त्यांच्याकडुन सुरू आहे. याआरोपात काहीही तथ्य नाही, यामुळे संस्थेची बदनामी करणाÚयांवर 1 कोटी रूपयाचा मानहानीचा दावा न्यायालयात दाखल करण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष निपचंद शेरकी यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले. पत्रकार परिषदेला संस्थेचे उपाध्यक्ष दिनेश पडगेलवार, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर शेगोकर, संचालक हरीष रायपुरे, दिलीप चिताडे, खेवले, जयश्री गडकर, वर्षाताई शेरकी, श्वेता सुनिल शेरकी, तज्ञ संचालक अॅड. प्रितम नागपूरे, वसुली अधिकारी पंकज आसमवार उपस्थित होते. Rayat Urban Cooperative Credit Society