Home Breaking News नदीच्या पुलावर तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

नदीच्या पुलावर तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

वरोरा (प्रतिनिधी) : पुलाच्या लोखंडी पाईपला कंबरेच्या बेल्टनी एका युवकांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने घटना माजरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाटाळा येथील वर्धा नदीच्या पुलावर घडली. तेजस्वी विजय मोगरे (२६) असे गळफास घेतलेल्या युवकाचे नाव आहे. सदर घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

तेजस्वी विजय मोगरे हा  वणी येथे गणपती पूजेसाठी त्याचे काका अजय मोगरे यांच्याकडे आला होता. तो यवतमाळ येथे शिकत होता. लोकांनी त्याला लटकलेले पाहून माजरी पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार विनीत घागी हे आपल्या कर्मचा-यांसह घटनास्थळी पोहोचले व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पाठविण्यात आले.

तेजस्वी मोगरे या तरुणाचा कालच एम.ए.परीक्षेचा निकाल लागला. त्यात तो चांगल्या गुणांनी उत्तीर्णही झाला. वृत्त लिहेपर्यंत मृत्यूचे कारण समजू शकले नाही.

error: Content is protected !!