Home Breaking News विज कोसळल्याने दोन महिला ठार : 3 जण जखमी

विज कोसळल्याने दोन महिला ठार : 3 जण जखमी

चंद्रपूर (प्रतिनिधी) : जिवती तालुक्यातील चिखली परिसरात बुधवारी सायंकाळी उशीरा विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला.

पावसादरम्यान वीज कोसळल्याने दोन महिलांचा मृत्यू झाला तर तीन मुले जखमी झाल्याची घटना घडली.

सायंकाळी शेतीचे काम करून पाच महिला मुलांसह घरी परत येत असताना विजेच्या कडकडाटासह अचानक पाऊस सुरू झाला. वंदना चंदू कोटनाके (३५), भारुला अनिल कोरांगे (३२) अशी मृत महिलांची नावे आहेत. तर तीन मुले जखमी झालीत. जखमींना पाटण प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

error: Content is protected !!