तंटामुक्ती समितीने लावला प्रेमवीरांचा विवाह

चिखली (प्रतिनिधी) : प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं, एकदा प्रेमात पडल की सर्व काही छानच दिसते, म्हणुनच म्हणतात प्रेम हे आंधळ असते, प्रेमासाठी काहीपण अशीच एक घटना मूल तालुक्यातील चिखली येथे घडली, शेवटी तंटामुक्त समितीच्या पुढाकारातुन प्रेमविरांचा विवाह लावुन देण्यात आला.

मूल तालुक्यातील चिखली येथील शुभम रामु मेश्राम वय 25 वर्षे आणि सिंदेवाही येथील पोर्णिमा मधुकर मेश्राम वय 24 वर्षे हे एकमेंकाना ओळखत होते, ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले, साथ जियेगे साथ मरेंगे म्हणत प्रेमात एकांत बुडाले आणि प्रेमविवाह करण्यासाठी कुटुंबियाचा विरोध असल्याने प्रेमविरांनी चिखली येथील तंटामुक्त समितीकडे प्रेमविवाह करून देण्याची विनंती केली, तंटामुक्त समितीच्या पुढाकारातुन आणि नागरीकांच्या उपस्थितीत चिखली येथील साईबाबा मंदिरामध्ये शुभम मेश्राम आणि पोर्णिमा मेश्राम यांचा विवाह लावुन देण्यात आला.

यावेळी चिखलीचे उपसरपंच दुर्वास कडस्कर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बबन कडस्कर, माजी सरपंच उमाजी दादा मंडलवार, गुरूदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष डोपाजी पाटील कडस्कर, सामाजिक कार्यकर्ते गिरीधर वाकुडकर, एकनाथ काटवले, रमेश मेश्राम, उमेश पाल, पुरूषोत्तम बोरकुटे व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.