पोलीस स्टेशन व पंचायत समितीमध्ये तक्रार दाखल
मूल (प्रतिनिधी) : तालुक्यातील बेंबाळ ग्रामपंचायत कार्यालयामधील यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतील फाइल्स ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ठेवले असताना ग्रामपंचायत कार्यालयातीलच रोजगार सेवक श्री. गोविंदा कोम्मावार रा. बेंबाळ तसेच श्री मुन्ना कोटगले माजी उपसरपंच रा. बेंबाळ यांनी ग्रामपंचायत कार्यालयातील फाइल्सची 1 ऑगष्ट रोजी परस्पर चोरी केल्याचा आरोप ग्रामपंचायत सरपंच चांगदेव केमेकार, उपसरपंच देवाची परिवार तथा ग्रामपंचायत सदस्यांनी केली Theft of crib files

.ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सांगण्यानुसार परस्पर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये येऊन कोणालाही विचारपूस न करता फाईलची सदर इसमांनी चोरी करून हडप केलेले आहे असे सांगितले. ग्रामपंचायत कार्यालयातील फाईल कोणत्याही जबाबदार पदाधिकारी व ग्रामसचिवाला न विचारता परस्पर चोरी करून नेणे हा गंभीर गुन्हा असून सदर व्यक्तिंची तात्काळ चौकशी करून जर दोषी आढळल्यास गंभीर गुन्हा दाखल करावा व ग्रामपंचायत कार्यालय कर्मचारी तथा रोजगार सेवक श्री. गोविंदा कोमावार यांचेवर प्रशासकीय कारवाई करून सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी सरपंच, उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे.