तालुका कार्यकारणी गठीत
मूल (प्रतिनिधी) : ग्राहकासंबधी राज्यस्तरावर काम करणाऱ्या ग्राहक पंचायतची मूल तालुका कार्यकारणी नुकतीच गठीत करण्यात आली असुन मूल तालुकाध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार दीपक देशपांडे यांनी निवड करण्यात आली आहे. सदर निवड विदर्भ प्रांत अध्यक्ष श्यामकांत पात्रीकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी विदर्भ प्रांत संघटक डॉ. कल्पना उपाध्याय, विदर्भ प्रांत सचिव लिलाधरजी लोहरे उपस्थित होते. Senior Journalist Deepak Deshpande as Mul Taluka President
यावेळी मूल तालुका अध्यक्षपदी म्हणुन जेष्ठ पत्रकार दीपक देशपांडे यांचे नाव घोषित केले. कार्यकारणीमध्ये उपाध्यक्षपदी अशोक मैदमवार, सचिव बादल करपे, संघटक तुळशीराम बांगरे, सहसंघटक राहुल आगडे यांची निवड करण्यात आली असुन कार्यकारीणी सदस्य म्हणुन परशुराम शेंडे, लक्ष्मण निकुरे, गणेश आक्केवार, सुनिल सेलेकर यांची निवड करण्यात आली. संघटना वाढीच्या दृष्टीने पदाधिकारी यांची निवड करण्याचे व संघटनेच्या कार्यकारणीत फेरबदल करण्याचे अधिकार अध्यक्षांना देण्यात आले आहेत .
यावेळी चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष परशुराम तुंडुलवार, कार्याध्यक्ष अरूण जामदाडे, जिल्हा सचिव आनंद मेहरकूरे, देविदास नंदनवार, सुधाकर बद्दलवार, चंद्रकांत बेतावार उपस्थित होते . पुढील कार्यासाठी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्वेत्र अभिनंदन करण्यात येत आहे.