जानाळा येथील घटना
संगिता गेडाम, जानाळा
दुपारच्या सुमारास अचानक आलेल्या वादळवाऱ्यामुळे मूल तालुक्यातील जानाळा येथील शांताबाई कारूजी वेळमे Shantabai Velme वय 60 वर्षे या शेतमजुर महिलेचे अचानक घर कोसळल्याने, तिच्या समोर निवाऱ्या प्रश्न निर्माण झाला आहे. सदर घटना मंगळवारी घडली. Mul Taluka
मूल तालुक्यातील मौजा जानाळा येथील शांताबाई कारूजी वेळमे ही शेतमजुर महिला आपल्या कुटुंबासह मातीच्या घरात गेली अनेक वर्षापासुन राहात होती, मंगळवारी दुपारच्या सुमारास अचानक आलेल्या वादळवाऱ्यामुळे शांताबाईचे संपुर्ण घर कोसळले, मजुरी करून घरात संसारोपयोगी साहित्य ठेवले होते परंतु घर कोसळल्याने मोठया मेहनतीने घरात ठेवलेले सर्व साहित्याचे अतोनात नुकसान झालेले आहेे. आदिवासी महामंडळ व ग्राम पंचायतकडे घरकुल मिळावा यासाठी मागील अनेक दिवसांपासुन शांताबाई प्रयत्न करीत आहे मात्र शांताबाईच्या पदरी अजुनही निराशाच येत असल्याचे दुःख खुद्द शांताबाईने व्यक्त केले आहे. Janala
शासनाने तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शांताबाईने केली आहे.







