जिल्हयात ‘‘ओ निगेटीव्ह’’ रक्तगटाचा तुटवळा : अनेकांना मिळाले जिवनदान
मूल (तालुका प्रतिनिधी): जिल्हयात ‘‘ओ निगेटीव्ह’’ रक्तगट असलेल्याची संख्या अतिशय अल्प आहे. त्यामुळे रूग्णांना रक्ताची गरज भासल्यास इतरत्र फिरावे लागते, मात्र मूल नगर पालिकेचे माजी सभापती प्रशांत समर्थ यांनी भरती असलेल्या गरजु रूग्णांना रक्ताची गरज पुर्ण करीत आहेत. Prashant Samarth
मूल नगर पालीकेचे माजी बांधकाम सभापती प्रशांत समर्थ हे “ओ निगेटीव्ह” रक्तगटाचे रक्त आहेत, सदर रक्तगट अतिशय कमी लोकांच्या शरीरामध्ये असते, आणि यारक्तगटाच्या रूग्णांना “ओ निगेटीव्ह” रक्तच दयावे लागते, ओ रक्तगट असलेले नागरीक कमी असल्याने रूग्णांना त्यासाठी इतरत्र फिरून रक्ताची गरज पुर्ण करावे लागते, मात्र मूल येथील माजी बांधकाम सभापती प्रशांत समर्थ यांना ज्या रूग्णांना रक्ताची गरज आहे त्यांना स्वतः जावुन त्यांची गरज पुर्ण करतात, आतापर्यंत त्यांनी 41 वेळा रक्तदान करून अनेक गरजु रूग्णांचा जिव वाचविले आहे, त्यांनी शिबिरामध्येही 10 वेळ रक्तदान केलेले आहेत, परंतु त्यांनी गरजू रुग्णांना रक्त देण्यास प्राधान्य देत आहेत. मूल पंचायत समितीची माजी उपसभापती गजानन वल्केवार यांचे वडील मनोहर वल्केवार Rajoli यांचे काही दिवसांपुर्वी अपघात झाले होते, ते चंद्रपूर येथील मेहरा हॉस्टिपल मध्ये भरती होते, त्यांना ओ निगेटिव्ह रक्ताची गरज पडली असता, प्रशांत समर्थ यांनी अंकुर ब्लॅड बॅंक मध्ये जावुन रक्तदान केले, रक्तदान करण्याची ही 41 वी वेळ होती, त्यांच्या यासामाजिक कार्यामुळे त्यांची सर्वत्र कौतुक करीत आहे. Manohar Walkewar