संध्याताई गुरनुले विधानपरिषदेवर जाण्याची शक्यता !

sandyatai Gurnule
sandyatai Gurnule

माजी मंत्री श्रीमती शोभाताई फडणवीस आणि आमदार जोरगेवारांचे प्रयत्न ?

मूल (प्रतिनिधी): सलग पाचवेळा जिल्हा परिषद क्षेत्राचे प्रतिनिधीत्व केलेल्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा संध्याताई गुरनुले यांना विधानपरिषदेची लॉटरी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे, त्यासाठी माजी मंत्री शोभाताई फडणवीस आणि चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार प्रयत्नशील असल्याची चर्चा जोर धरत आहे. sandyatai Gurnule

चंद्रपूर जिल्हा भाजपाच्या महामंत्री संध्याताई गुरनुले यांना जिल्हा परिषदेचा दांडगा अनुभव आहे, त्या मूल तालुक्यातील तिन्ही जिल्हा परिषद क्षेत्राचे प्रतिनिधीत्व केलेल्या आहे, त्याना असलेल्या जिल्हा परिषदेच्या अनुभवावरून भाजपा पक्ष श्रेष्टीने त्यांना जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची सुत्रेही त्यांच्या हाती दिले होते, त्या  माळी महासंघाच्या विदर्भाच्या नेत्या असुन त्यांच्या नेतृत्वात मूल तालुक्यातील काही ग्राम पंचायतवर भाजपाचे वर्चस्व आहे, बल्लारपूर विधानसभेचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे त्या खंदे समर्थक आहे, परंतु गेल्या काही दिवसांपासुन चंद्रपूर भाजपामध्ये गटबाजीचे राजकारण पाहायला मिळत आहे. चिमूरचे आमदार बंटी भांगडिया यांच्या वाढदिवसानिमित्त मूल शहरात लावलेल्या बॅनर मध्ये सुधीर मुनगंटीवार यांचे फोटो नसल्याने स्थानिक राजकारणा मध्ये गटबाजीचे चिन्ह स्पष्टपणे दिसत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात भाजपा मध्ये सुरु असलेली राजकीय गटबाजी बाजूला सारून काही दिवसापूर्वी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा संध्याताई गुरनुले यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे, यावेळी चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार आणि भाजपाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगट्टुवार उपस्थित होते.

संध्या गुरनुले हया भाजपाच्या जेष्ठ नेत्या माजी मंत्री शोभताई फडणवीस यांच्या शिष्य आहे, श्रीमती फडणवीसांच्या मार्गदर्शनात त्यांनी पक्षाचे अनेक पदे भुषविल्या, त्यासोबतच त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणुनही निर्वाचीत झाल्या होत्या, 2008 पुर्वी मूल तालुका सावली विधानसभा क्षेत्रात होता, त्यानंतर बल्लारपूर विधानसभेचे परिसीमन झाल्यानंतर मूल तालुका बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात समाविष्ठ झाले, आणि 2009 मध्ये झालेल्या बल्लारपूर विधानसभा क्षेत्राच्या निवडणुकीत सुधीर मुनगंटीवार निवडुन आले, त्यानंतर संध्याताई गुरनुले आमदार मुनगंटीवार यांच्यासोबत भाजप पक्षाचे  संघटन बांधणीचे काम करीत आहेत, मूल तालुकाध्यक्ष म्हणुनही त्यांनी गेल्या महिण्यापर्यंत यशस्वीपणे कार्य केलेले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष म्हणुनही त्यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात काम केले, परंतु गेल्या काही दिवसापुर्वी् आमदार किशोर जोरगेवार यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची झालेल्या भेटीमुळे राजकीय चर्चेला उत आले असुन माजी मंत्री शोभाताई फडणवीस आणि आमदार जोरगेवार यांनी मुख्यमंत्रीसोबत  बोलुन संध्या गुरनुले यांना विधान परिषदेवर घेण्याबाबत प्रयत्न करणार असल्याची चर्चा तालुक्यात आहे.  शेवटी राजकारणात काहीही होवु शकतो. Shobhatai Fadnavis and MLA Jorgewar