प्रभाग 8 मध्ये काटयाची टक्कर
भोजराज गोवर्धन, मूल
2 डिसेंबर रोजी होवु घातलेल्या मूल नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रं. 8 हे अनुसुचित जाती पुरूष प्रवर्गासाठी राखीव आहे, यासाठी सात इच्छुकांनी उमेदवारी मिळावी यासाठी पक्षाकडे अर्ज दाखल केले आहे, मात्र याठिकाणी प्रब्बळ दावेदार म्हणुन भाजपाचे युवा नेते प्रज्योत रामटेके आणि माजी नगरसेवक मिलींद खोब्रागडे यांच्याकडे बघितले जाते. मात्र पक्षश्रेष्टी कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कॉंग्रेसकडुन पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते अतुल गोवर्धन यांना उमेदवारी जवळजवळ जाहिर झाल्यासारखी आहे. Ward No. 8
मूल नगर परिषद क्षेत्रात 10 प्रभाग असुन 20 नगरसेवक निवडुन दयायचे आहे, यासाठी भाजपा-कॉग्रेसकडुन उमेदवारी देण्यासाठी चाचपणी सुरू आहे, अनुसुचित जातीसाठी 3 प्रभाग आरक्षीत करण्यात आले असुन प्रभाग क्रं. 9 (अ) आणि 10 (अ) हे अनुसचित जाती महिलासाठी राखीव आहे तर प्रभाग क्रं. 8 (अ) अनुसुचित जाती पुरूष प्रवर्गासाठी राखीव आहे. यामुळे प्रभाग क्रं. 8 (अ) मधुन प्रज्योत रामटेके, मिलींद खोब्रागडे, रवी बरडे, आस्तिक मेश्राम, आशिष गेडाम, दिलीप रामटेके आणि हस्ते यांनी भाजपाकडुन उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक आहेत, यासाठी त्यांनी पक्षाकडे अर्ज भरून दिलेला आहे. पक्षाने मात्र अजुन तरी कोणतेही उमेदवार जाहिर केले नाही मात्र प्रज्योत रामटेके किंवा मिलींद खोब्रागडे यांना उमेदवारी जाहिर होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. Prajot Ramteke, Milind Khobragade
प्रज्योत रामटेेके हे प्रभाग क्रं. 8 मधील मतदार आहेत, त्यांनी 2013 पासुन भारतीय जनता पक्षात सक्रीय सभासद म्हणुन कार्य केलेले आहेे, त्यानंतर त्यांच्याकडुन पक्षासाठी केलेल्या कार्याची तळमळ बघुन पक्षाने त्यांना सोशल मिडीयाचे मूल तालुका सयोजक म्हणुन जबाबदारी दिली, याकार्यकाळात त्यांनी पक्षाची भुमिका सोशल मिडीयाच्या माध्यमातुन घराघरात पोहचविण्यासाठी मोलाची भुमिका बजावली, याकार्याची दखल घेवुन पक्षाने त्यांना विधानसभा संयोजक म्हणुन जबाबदारी दिली, याकाळात त्यांनी अतिशय उत्तम काम केलेले आहे. तर माजी नगरसेवक मिलींद खोब्रागडे यांनी मागील 2 टर्मपासुन नगरसेवक म्हणुन काम करीत आहे, नागरीकांच्या कामासाठी ते नेहमीच धडपड करीत असतात ही त्यांची जमेची बाजु आहे मात्र त्यांचे मतदान प्रभाग 4 मध्ये आहे, त्यामुळे यावार्डातील काही मतदार स्थानिक उमेदवार असावा म्हणुन त्यांच्या उमेदवारीबद्दल यावार्डातील काही नागरीक काही प्रमाणात नाराज असल्याची चर्चा आहे. यामुळे पक्षाने यावार्डात नेमकी कोणाला उमेदवारी जाहिर करेल याबाबत मतदार आणि शहरातील नागरीकांना याउमेदवारीवरून उत्सुकता लागली आहे. Municipal Council Election
कॉंग्रेस पक्षाकडुन अतुल गोवर्धन यांना उमेदवारी जाहिर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे भाजपा-कॉंग्रेस यादोन प्रबळ पक्षांच्या उमेदवारांमध्येच काटयाची टक्कर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. Atul Gowardhan







