सामाजिक कार्य, अभ्यासू व्यक्तिमत्त्वामुळे मतदारांचा सकारात्मक कल
मूल (प्रतिनिधी) : मूल नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 10 साठी येत्या 20 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार निलेश राय यांना मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याची चर्चा आहे. सामाजिक व धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग, गरजूंसाठी सातत्याने केलेली मदत आणि स्पष्ट विचारसरणीमुळे ते प्रभागात परिचित चेहरा ठरले आहेत.
निलेश राय हे सामाजिक जाणीव असलेले कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. अनेक गरजू नागरिकांना त्यांनी वेळोवेळी आर्थिक व इतर स्वरूपाची मदत केल्याने त्यांच्याबद्दल प्रभागात सकारात्मक भावना असल्याचे चित्र आहे. यापूर्वी प्रभागातील काही बड्या प्रस्थापितांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी आपली आई रजनी रायकंटीवार यांना अपक्ष म्हणून निवडून आणले होते, ही बाब त्यांच्या संघटन कौशल्याचे उदाहरण म्हणून पाहिली जात आहे.
उच्च विद्याविभूषित, उत्तम वक्ते, लेखनाची आवड, विचारवंत वृत्ती आणि आपली भूमिका स्पष्टपणे मांडणारे व्यक्तिमत्त्व अशी निलेश राय यांची ओळख आहे. अशा अभ्यासू व प्रगल्भ विचारांच्या व्यक्तीची नगरसेवक म्हणून निवड झाल्यास शहराच्या विकासाला निश्चित दिशा मिळेल, असे मत प्रभागातील अनेक मतदार व्यक्त करीत आहेत.
निवडणूक प्रचार जसजसा अंतिम टप्प्यात येत आहे, तसतशी प्रभाग 10 मध्ये निलेश राय यांच्या बाजूने वातावरण तयार होत असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत त्यांना विजय मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.








