गुलाब पठाण, बंडु गुरनुले यांची स्विकृत सदस्यपदी निवड
मूल (प्रतिनिधी): मूल नगर परिषदेत बहुमतात निवडुन आलेल्या कॉंग्रेस पक्षाकडुन उपाध्यक्ष म्हणुन राकेश रत्नावार तर स्विकृत सदस्य म्हणुन गुलाब पठाण व बंडु गुरनुले यांची अविरोध निवड करण्यात आली आहे. राजकीय चाणक्य म्हणुन ओळख असलेल्या राकेश रत्नावार हे कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संतोषसिंह रावत यांचे विश्वासु मानले जातात. Rakesh Ratnawar

मूल नगर पालीकेच्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार एकता प्रशांत समर्थ यांचेसह 18 नगरसेवक निवडुण आले, प्रभाग क्रं. 4 मधुन राकेश रत्नावार हे निवडणुक लढवुन माजी पाणी पुरवठा सभापती अनिल साखरकर यांच्यापेक्षा 72 टक्के अधिक मते मिळवुन ते निवडुण आले होते. त्यानंतरच त्यांची गटनेते आणि उपाध्यक्षपदी वर्णी लागेल असे राजकीय जाणकारांमध्ये चर्चा होती, ती आज प्रत्यक्षात खरी ठरली. Mul Municipal Council
अल्पवयात राजकारणात पदार्पण केलेल्या राकेश रत्नावार हे अवघ्या 22 व्या वर्षी नगरसेवक मूल निवडुन आले, त्यांनतर त्यांनी नगर परिषदेचे बांधकाम, पाणी पुरवठा, शिक्षण आणि नियोजन सभापती म्हणुन यशस्वी कार्यकाल पुर्ण केलेला आहे. 3 टर्म नगर परिषद निवडणुकीत निवडुण आलेल्या राकेश रत्नावार चारदा उपाध्यक्षपदी निवड झालेली होती, यंदाच्या 4 थ्या टर्ममध्येही ते निवडुन आलेत, संघटनात्मक ताकद आणि आक्रमक निर्णय क्षमतेसाठी ते प्रसिध्द असल्याने त्यांची उपाध्यक्ष म्हणुन पाचव्यांदा अविरोध निवड करण्यात आली. सदर निवडीमुळे त्यांच्या चाहत्यामध्ये आनंदोत्सव साजरा केला जात आहे. राकेश रत्नावार हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणुनही यशस्वी भुमिका बजावीत आहेत. शेतकऱ्यांप्रती असलेल्या विश्वासाखातर त्यांची सभापतीपदी दुसऱ्यांदा वर्णी लागली. Gulab Pathan
स्विकृत सदस्य म्हणुन गुलाब पठाण आणि बंडु गुरनुले यांची अविरोध निवड करण्यात आली. सदर निवडीनंतर मूल येथे कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. Bandu Gurnule









