भाजपा शहर अध्यक्ष प्रविण मोहुर्ले यांचा दावा
मूल (प्रतिनिधी): नगर पालीकेने विज बिलाचा भरणा न केल्यामुळे विज वितरण कंपनीने विज पुरवठा खंडीत केला, यामुळे मूल शहराला पाणी पुरवठा करण्यात नगर पालीका अपयशी ठरली, मात्र नगर पालीकेच्या पदाधिकारी नगरसेवकांनी तांत्रिक बिघाळामुळे पाणी पुरवठा होणार नसल्याचे आवाहन जनतेला केले जात आहे, यापध्दतीने मूलच्या नगर पालीका पदाधिकारी, नगरसेवकांनी खोटं बोला परंतु रेटुन बोला असा पवित्रा घेत असल्याचा आरोप भाजपाचे मूल शहर अध्यक्ष तथा मूल नगर पालीकेचे माजी उपाध्यक्ष प्रविण मोहुर्ले यांनी केला आहे. Policy of Congress Office-bearers
मूल येथील पत्रकार भवन येथे पार पडलेल्या सभेत भाजपा शहराध्यक्ष प्रविण मोहुर्ले यांनी पुढे म्हणाले की, मूल नगर पालीकेच्या अध्यक्षा एकता समर्थ व पदाधिकाऱ्यांनी राजकीय सुळबुध्दीने विज वितरण कंपनीकडुन नगर पालीकेची विज खंडीत करण्यात आल्याचा आरोप केलेला आहे, नगराध्यक्ष यांनी बिनबुळाचे आरोप करण्यापेक्षा जनतेला पुरावे देवुन समाधान करावेत, केवळ वाऱ्याला फाशी देण्यात अर्थ नाही, भारतीय जनता पार्टीची गेली 15 वर्षे मूल नगर पालीकेवर सत्ता होती, याकाळात मूल शहरातील जनतेला कधीही पाण्यासाठी त्रास झालेला नाही, परंतु अडीच महिण्यात कॉंग्रेस पक्षाची नगर पालीकेवर सत्ता येताच जनतेला पाण्यासाठी इतरत्र भटकण्याची वेळ जनतेवर आलेली आहे. BJP Mul
मूल नगर पालीका निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाने वचननामा जनहिताचा प्रसिध्द केला होता, जवळपास तिन महिले लोटुन जात आहे, मात्र वचनाम्यानुसार समस्या आजही जैसे थे आहे, याकडे नगराध्यक्षांनी स्वतः लक्ष दयावे केवळ स्वार्थापोटी बिनबुळाचे आरोप करू नये असाही टोला प्रविण मोहुर्ले यांनी लगावला, प्रभाग क्रं. 8 मध्ये रस्त्याच्या कामांासाठी आमदार मनिषा कायंदे यांच्या आमदार निधीमधुन निधी मंजुर केला होता, नगर पालीकेने सदर निधीमधुन निवीदा काढली, मात्र एकाच सलग रस्ताचे ऑनलाईन निवीदा टाकणे आवश्यक होते, मात्र नप पदाधिकाऱ्यांच्या आग्रहास्तव दोन ऑफलाईन निवीदा प्रसिध्द केलेली होती, सदर बाब विधान परिषद सदस्य प्रा. डॉ. आमदार मनिषा कायंदे यांना माहिती होताच, सदर निधी आमदार कायंदे यांनी परत घेत असल्याचे पत्र जिल्हाधिकारी यांचेकडे प्राप्त झाल्याचे यावेळी सांगीतलेश् यापध्दतीने नगर पालीका पदाधिकारी काम करीत असेल तर खरचं शहराचा विकास होईल काय असा प्रश्नही प्रविण मोहुर्ले यांनी उपस्थित केला आहे. MLA Kayande
यावेळी नगर पालीकेचे माजी गटनेते मोतीलाल टहलियानी, माजी नगरसेवक अजय गोगुलवार, नगरसेवक अश्विनी निकोडे, प्राची आक्केवार, शहर महामंत्री दादाजी येरणे, जितु टिंगुसले उपस्थित होते









