मूलमध्ये मालधक्का प्रकरण तापले : नगरसेवकांना लाखोंची ऑफर? Municipal Council

Mul Municipal Council
Mul Municipal Council

मालधक्क्यासाठी पैशांचा खेळ

मूल (प्रतिनिधी) : मूल शहरात प्रस्तावित रेल्वे मालधक्का प्रकल्पावरून मूल शहरात वातावरण चांगलेच तापले असून, या प्रकरणाला आता गंभीर आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. Municipal Council

मूल शहर बचाव संघर्ष समितीच्या वतिने मूल नगर पालीकेला मालधक्काचे दुष्परिणाम लक्षात घेतान मालधक्का मूल शहरात होवु नये यासाठी ठराव घेण्याची मागणी केली होती, सदर मागणीच्या अनुषंगाने मूल नगर पालीकेच्या अध्यक्षा एकताताई प्रशांत समर्थ यांनी मूल नगर पालीकेची तातडीची सभा 9 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता आयोजीत केली आहे. हा ठराव पास होवु नये यासाठी काही मंडळीकडुन चांगलीच फिल्डींग लावली असुन मिळालेल्या विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, काही स्वार्थी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी नगर परिषदेमधील काही नगरसेवकांना मालधक्क्याच्या बाजूने मत मांडण्यासाठी किंवा बैठकीस गैरहजर राहून अप्रत्यक्ष पाठिंबा देण्यासाठी लाखो रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप समोर येत आहे. अशी ऑफर मिळाल्याचे एका नगरसेवकांनी आमचे प्रतिनिधीला नाव न सांगण्याच्या अटीवर कबूल केले. या कथित प्रकारामुळे शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, लोकशाही प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उद्या होणाऱ्या नगर परिषद बैठकीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. Ekta Samarth

यासंपुर्ण प्रक्रियेवरून मूल शहरातील काही नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, “शहराच्या भवितव्याशी तडजोड करणाऱ्यांना माफ केले जाणार नाही”, असा इशाराही देण्यात येत आहे. उद्याच्या बैठकीत नगरसेवक कोणती भूमिका घेतात, यावर मूल शहराचा विकासाचा मार्ग ठरणार असल्याने, ही बैठक अत्यंत निर्णायक मानली जात आहे. Pollution