स्वतःचे शहर भक्कास होईल असे का म्हणाले मुनगंटीवार MLA Mungantiwar

MLA Mungantiwar
MLA Mungantiwar

केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करून मालधक्काला करणार विरोध

मुल (प्रतिनिधी) : मूल रेल्वे स्थानकावर प्रस्तावित मालधक्का उभारून सुरजागड येथील लोहखनिजाची वाहतुक करण्याची योजना सुरू आहे, सदर मालधक्का मूल शहरात उभारल्यास मूल शहराची प्रचंड हाणी होणार आहे, यामुळे मूल शहरात मालधक्का होवु देणार नाही यासाठी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा करून मालधक्कास आपण तिव्र विरोध करणार असल्याचे आश्वासन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मालधक्का विरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिले. बल्लारपूर रेल्वे स्टेशन आमदार सुधीर मुनगंटीवार यांची शुक्रवारी भेट घेवुन शिष्टमंडळाने त्यांना निवेदन दिले. MLA Mungantiwar

MLA Mungantiwar1
MLA Mungantiwar1

मुल नगरपरिषदेने मालधक्का विरोधात ठराव घेतलेला आहे. त्यामुळे आपल्या मागणीला कायदेशीर बळ मिळाले आहे, असे सांगत आमदार मुनगंटीवार यांनी या ठरावाबद्दल समाधान व्यक्त केले. Mul

MLA Mungantiwar2
MLA Mungantiwar2

कृती समितीचे जीवन कोंतमवार यांनी आमदारांच्या निदर्शनास आणून दिले की, मुल शहरापासून फक्त पाच किलोमीटर अंतरावर, याच रेल्वे मार्गावर केळझर येथे मालधक्का कार्यरत आहे. तरीही काही जण जाणीवपूर्वक मुल शहरात नवीन मालधक्का उभारण्याचा प्रयत्न करत आहेत. Jiwan Kontamwar

MLA Mungantiwar3
MLA Mungantiwar3

शिष्टमंडळात यावेळी जीवन कोंतमवार, बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, अनिल मोगरे, विजय सिद्धावार, ॲड. प्रणव वैरागडे, ॲड. अश्विन पॉलीकर, महेश गाजुलवार, कृउबास संचालक अमोल बच्चुवार, डेव्हिड खोब्रागडे, चंद्रपूर जिल्हा सहकार प्रशिक्षण केंद्राचे संचालक भोजराज गोवर्धन, विवेक मांदाडे, नितीन येरोजवार, आकाश कावळे, संदीप मोहबे, श्रीकांत बुक्कावार यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.