सोमवार पासून चिमुर तालुक्यातील आठवड़ी बाजार बंद

उपविभागीय अधिकारी प्रकाश संपकाळ यानी घेतला निर्णय

चिमुर  (प्रतिनिधी) : तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे उपविभागीय अधिकारी प्रकाश संपकाळ यांचे उपस्थित गुरुवारी दुपारी 3 वाजता कोरोना नियंत्रित करन्यासन्दरभात बैठक सम्पन झाली,

सम्पूर्ण देशात कोरोनाची तीसरी लाट सुरुवात झाली असून चिमुर तालुक्यात कोरोना नियंत्रित करन्याकरिता चिमुर तहसील कार्यालय येथे नियोजन बैटकीचे आयोजन करण्यात आले होते, बैठकीमधे तालुक्यातील आठवडी बाजार दिनांक 17 जानेवारी ते 15 फेबुरवारी पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला, तसेच व्यावसायिकानी स्वता दोन डोज घेतलेले असावेत व दुकानातील कामगारानी दोन डोज घेतलेले असेल तरच दुकान सुरु करता येईल, ज्या ग्राहकानी दोन डोज घेतले असतील त्याच वस्तु विकन्यात यावे, नागरिकांनी मास्क लावणे जरूरी आहे, विना मास्क आढळल्यास दंड ठोकन्यात येईल अशा सूचना उपविभागीय अधिकारी प्रकाश सकपाल यानी केली आहे.

बैठकीकरीता तहसीलदार प्राजक्ता बुरांडे, नायब तहसीलदार तुलसीदास कोवे, वैध्किय अधिक्षक डॉ, गोपाल भगत, सहायक पोलिस नीरीक्षक मंगेश मोहोड़, नगरपरिषद अधिक्षक प्रदीप रणखांब, विस्तार अधिकारी कुंभारे मैडम, व्यापारी मंडलाचे अध्य्क्ष प्रवीण सातपुते, सचिव बबन बनसोड, उपाध्यक्ष श्याम बंग, श्रीहरी बालाजी बहुद्देश्यीय व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सारंग दाभेकर, सचिव प्रकाश बोकारे, पप्पू शेख, पत्रकार प्रतिनिधि बालू सातपुते, नितिन लोथे, उपस्थित होते,