आर्थीक नुकसान झाल्याने युवकाने गळफास घेवुन केली आत्महत्या suicide

Ankit Khobragade
Ankit Khobragade

मूल येथील घटना

मूल (प्रतिनिधी): बाजाराबाजारात हॉटेल लावुन कुटुंबियांसह आपली उपजिवीका करणाऱ्या युवकाचे मागील दोन दिवसांपासुन आर्थीक नुकसान होत असल्याने निराश झालेल्या अंकित विलास खोब्रागडे वय 27 वर्षे रा. मूल याने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी 6 वाजता दरम्यान उघडकीस आली. Ankit Khobragde

मूल येथील रामलीला भवनाचे मागील बाजुला राहणाऱ्या अंकित विलास खोब्रागडे हा बाजाराबाजारात हॉटेल लावत होता, दोन दिवसापासुन हॉटेलच्या व्यवसायासंबधी साहित्य तयार करून ठेवला होता, परंतु त्यांला हॉटेल सुरू करता आले नाही, यामुळे बनविलेले साहित्य फेकुण दयावे लागले, दरम्यान निराश झालेल्या अंकितने आकापूर स्थित असलेल्या एम आय डी सी मधील एका कंपनी मध्ये जावुन रोजगार सुध्दा बघितल्याची चर्चा आहे मात्र अचानक त्यांने राहत्या घरात गळफास घेवुन आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे. काही वर्षापुर्वी अंकितचे वडील विलास खोब्रागडे यानी गळफास घेवुनच आत्महत्या केले होते. youth committed suicide by hanging himself

सदर घटनेची माहिती मूल पोलीस स्टेशन ला दिली असता मूल पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मूल उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले.

मृतकाच्या पश्चात पत्नी, आई आणि भाऊ असा आप्तपरिवार आहे. सदर घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे. Hotel business