मॅजिक बस संस्थेच्या वतीने मुख्यध्यापकांची एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

सावली प्रतिनिधी:- मॅजिक बस संस्थेचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा. प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात व नियंत्रनात सावली तालुक्यात SCALE – KCF कार्यक्रमा अंतर्गत १२ ते १६ वर्षे वयोगतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी “खेळाद्वारे शिक्षण/जीवन कौशल्य विकास” हा कार्यक्रम चालू वर्ष 2022 पासून राबविला जात आहे. त्याच अनुषंगाने सदर कार्यक्रमाची माहिती पंचायत समिती सावलीच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळेतील मुख्यध्यापकांना सदर चालू असलेल्या कार्यक्रमाची माहिती व्हावी त्याकरिता दिनांक 21-03-2022 रोज सोमवारला पंचायत समिती सावली येथे सर्व मुख्यध्यापकांची एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेच्या माध्यमातून उपस्थित सर्व शाळेतील मुखध्यापकांना सर्वप्रथम मॅजिक बस संस्थेच्या कार्याची माहिती देण्यात आली तसेच SCALE कार्यक्रम शालेय विद्यार्थ्यांसाठी कसा फायदेशीर ठरू शकतो त्याचे महत्व पटवून देण्यात आले.

त्यानंतर सर्व शाळेतील मुख्यध्यपकांना सावली तालुक्यातील खेडी या गावातील मॅजिक बसचे चालू असलेले प्रत्यक्ष कार्य दाखविण्यात आले.यामध्ये त्यांना शाळेतील शिक्षकांचे सत्र,शाळेचे ध्येय,बालपंचायत,गट करार,वर्तणूक व्यवस्थापन प्रणाली,वार्षिक चक्र, मुलांचे अभ्यास कोपरे व गावातील माजी पंचायत समिती सभापती,पदाधिकारी,पालक,शाळा व्यवस्थापन समिती,सर्व शिक्षक, मुखध्यापक यांच्याशी मॅजिक बसचा कार्यक्रम आपल्या शाळेला, सर्व गावाला आणि सर्व विद्यार्थ्यांना कसा फायदेशीर आहे हे चर्चेच्या माध्यमातून सर्व मुख्यध्यापकांना सांगण्यात आले.

या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी श्री.आकाश गेडाम तालुका समन्वयक मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन सावली, शाळा सहाय्यक अधिकारी संदेश रामटेके,मंगेश रामटेके , दिनेश कामतवार,शुभांगी रामगोणवार, निशा उमरगुंडावार व गावातील समुदाय समन्वयक प्रतिक तुंगीडवार यांनी प्रयत्न केले.