बेरोजगारीला कंटाळून युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

पोलीसानी केला मर्ग दाखल

विसापूर (प्रतिनिधी) :  येथील एका तरुणाने बेरोजगारीला कंटाळून घरी कोणी नसताना दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी ११ वाजता विसापूर येथे घडली. सुनील रामचंद्र देवाळकर ( २६ ) रा. विसापूर ता. बल्लारपूर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

सुनील देवाळकर हा होतकरू होता. विधवा आई सोबत राहत होता. त्याचा मोठा भाऊ सुधीर हा आपल्या कुटूंबासह वेगळा राहत होता. मिळेल ते काम करून तो आईचे पालनपोषण करत होता. नियमित काम मिळत नसल्याने सुनील व्यथित होता. याचा त्याचेवर विपरीत परिणाम होऊन त्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. विधवा आईचा आधार हरपल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी मर्ग दाखल केला असून घटनेचा अधिक तपास करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here