महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीची कार्यकारणी गठीत

अध्यक्षपदी दिलीप गेडाम तर कार्याध्यक्षपदी सिंधुताई नैताम यांनी निवड

मूल (प्रतिनिधी) : गेल्या अनेक वर्षापासुन अंधश्रध्दा निर्मुलनाचे कार्य करणाऱ्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा मूलची कार्यकारिणी शनिवारी दुपारी 5 वाजता मूल (विहीरगांव) येथील बुध्द विहारात सामाजिक कार्यकर्ते दिलीप गेडाम यांचे अध्यक्षतेखाली व राज्य कार्यकारिणी सदस्य रामभाऊ डोंगरे यांचे प्रमुख उपस्थितीत सभा घेवुन सर्वानुमते कार्यकारणी घोषित करण्यात आली. कार्यकारणीमध्ये अध्यक्षपदी दिली गेडाम तर कार्याध्ध्यपदी सिंधुताई नैताम यांनी सार्वनुमते निवड करण्यात आली.

कार्यकारणीमध्ये उपाध्यक्ष विनायक रामटेके, प्रधान सचिव – स्मिता सहारे, विविध उपक्रम कार्यवाह गोकुळदास बांबोडे, वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प कार्यवाह कविराज मानकर, बुवाबाजी संघर्ष्ज्ञ कार्यवाह डॉ. जयदीश निमगडे, महिला सहभाग कार्यवाहन सपना निमगडे, निधी संकलन कार्यवाह सहदेव रामटेके, वार्तापत्र विभाग कार्यवाह श्वेता उराडे, मानसिक आरोगय विभाग कार्यवाह बबिताताई गेडेकर यांचा कार्यकारणीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

कार्यकारणी गठीत करण्यासाठी सहदेव रामटेके, काजल दुधे, विनायक रामटेके, यांनी अथक परिश्रम घेतले.