आश्रम शाळेतील तेरा वर्षीय मुलीवर अत्याचार

भद्रावती तालुक्यातील तांडा येथील आश्रम शाळेतील प्रकार

अतुल कोल्हे भद्रावती
तालुक्यातील आश्रम शाळेतील एका तेरा वर्षीय आदिवासी मुलीवर आश्रम शाळेत अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. हा धक्कादायक प्रकार तालुक्यातील तांडा (बरांज) येथील खाजगी आश्रम शाळेत घडला. या प्रकरणात एकास चौकशीसाठी भद्रावती पोलिसांनी अटक केली आहे.

सदर मुलगी ही हिंगणघाट येथील असल्याने प्रथम हिंगणघाट पोलिसात याची तक्रार करण्यात आली मात्र सदर घटना भद्रावती तालुक्यात घडल्याने सदर प्रकरण भद्रावती पोलीस ठाण्यात वळते करण्यात आले. हिंगणघाट येथे राहणाÚया या मुलीचे नाव शिक्षण घेण्यासाठी तांडा येथील खाजगी आश्रम शाळेत दाखल करण्यात आले होते. येथील अधीक्षकांनी ४ ऑगस्ट ला आश्रम शाळेत पीडित मुलीच्या वडिलांना बोलावून तुमच्या मुलीची प्रकृती बरी नाही तुम्ही तीला घेवून जा असे सांगितले. त्याच दिवशी भद्रावती येथे येवून मुलीला हिंघनघाट येथे नेले व दुसÚ़्या दिवशी मुलीची शासकीय रुगणालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली. मात्र त्यातून काही माहिती दिली नाही. घरच्यांनी मुलीची अवस्था बघता खाजगी रुग्णालयात तपासनी केल्यानंतर सदर बाब उघडकीस आली. त्यानंतर हिंघनघाट पोलीस स्टेशन गाठून या घटनेची तक्रार देण्यात आली. मुलगी अजूनही स्पष्ट पने सांगत नसुन हा सर्व प्रकार पिडीतीच्या वडीलांनी सांगत सदर मुलीवर अत्याचार केल्याची बाब पुढे आली असुन या घटनेचा तपास भद्रावती पोलिसांनकडे देण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित गुन्हे दाखल करून एकास चौकशीसाठी अटक केली आहे. पीडीत मुलीवर नागपूर येथे उपचार सुरु आहे. या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.