मुलांची हत्या करणाऱ्या पित्याची अखेर आत्महत्या#suicide

वरोरा (प्रतिनिधी) : आपल्या पोटच्या मुलांना विष पाजुन हत्या करणाऱ्या पित्याने अखेर साखरा मंगरूळ रोडवरील शेतात आत्महत्या केल्याचे उघडकीस आलेे आहे  संजय श्रीराम कांबळे असे मुलांची हत्या करून आत्महत्या केलेल्या आरोपींचे नांव आहे suicide

जन्मदात्या पित्यानेच केला पोटच्या मुलांचा खून

नागपूर चंद्रपूर महामार्गावरील शालिमार ट्रेडच्या मागील वसाहतीत संजय श्रीराम कांबळे वय 42 वर्षे यांनी 5 वर्षीय मुलगा आणि 3 वर्षाच्या मुलीला जबरदस्तीने विष पाजुन हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. Murder by poisoning

उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपानी, पोलीस निरीक्षक दीपक खोब्रागडे यांनी घटनास्थळी धाव घेतली त्वरित तपासाचे चक्र संजयच्या मूळ गावी असलेल्या साखरा या दिशेने वळविले अखेर पोलिसांना संजय याचा मृतदेह साखरा मंगरूळ रोडवर असलेल्या एका शेतामध्ये आढळून आला आर्थिक विवंचनेतून सदर हत्या घडवुन आणल्याची शक्यता वर्तविली जात आहे. मुलांच्या हत्ये नंतर संजय याने आपले जीवन संपविले, पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे