नामशेष झालेल्या चित्ताच्या पुर्नवसनासाठी वनविभाग सक्रीय : घनश्याम नायगमकर

कर्मविर महाविद्यालयात मार्गदर्शनपर कार्यकम संपन्न

मूल (प्रतिनिधी) : जगात सर्वात वेगाने धावणारा चित्ता हा प्राणी भारताबरोबरच आशियातील अनेक देशांमध्ये लुप्त होत आहे, ताशी शंभर किलोमिटर वेगाने तो धावु शकतो, आज पुर्ण जगामध्ये फक्त आफ्रिकेतील काही भागांमध्ये चित्ता आढळुन येतो, यामुळे वनविभागाने चित्ता या प्राण्याचे पुनर्वसन मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यान शिवपूर येथे करण्यासाठी पुढाकार घेतला असुन त्यादृष्टीने वनविभाग सक्रिय झालेले असल्याचे प्रतिपादन मूल येथील बफर क्षेत्राचे वनपरिक्षेत्राधिकारी घनश्याम नायगमकर यांनी व्यक्त केले. ते वनपरिक्षेत्र कार्यालय, मूल व संजीवन पर्यावरण संस्थेच्या वतिने कर्मविर महाविद्यालयात आयोजीत जनजागृती कार्यक्रमात बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मवीर महाविद्यालयाच्या प्राचार्या अनिता वाळके होते. प्रमुख अतिथी म्हणुन संजीवन पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष उमेशसिंह झिरे, विज वितरण कंपनीचे सहा. अभियंता मनोज रणदिवे, सर्पमित्र प्रशांत केदार, पर्यावरणवादी प्रा. प्रभाकर धोटे आदी उपस्थित होते.

विदेशातून आनलेले चार जोडी चित्ते १७ सप्टेंबर रोजी मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात येणार असल्याची माहिती संजीवन पर्यावरण संस्थेचे उमेशसिंह झिरे यांनी यावेळी दिली. यावेळी कर्मविर महाविद्यालयाच्या प्राचार्य अनिता वाळके यांनीही चित्ता या प्राण्याबद्दल थोडक्यात माहिती दिली.

कार्यकमाचे संचालन अंकुश वाणी यांनी केले. तर उपस्थितांचे आभार प्रा. गणेश आगलावे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीयतेसाठी अक्षय दुम्मावार, रुपेश खोब्रागडे, प्रतीक लेनगुरे, हर्षल वाकडे, अनुराग मोहुर्ले, जय मोहूर्ले, यश केदार यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.