कालव्यात बुडुन अकरा वर्षीय मुलीचा मृत्यु

ब्रम्हपुरी (प्रतिनिधी) : आजी सोबत शेतावर गेल्यानंतर शौचासाठी गेलेल्या मुलीचा गोसिखुर्द कालव्यात तोल गेल्याने पाण्यात पडुन मृत्यु झाल्याची घटना रविवारी सकाळी 11 वाजता दरम्यान घडली. अमृता संदिप मरस्कोल्हे वय 11 वर्षे रा. रानबोथली असे मृतक मुलीचे नांव आहे.

ब्रम्हपुरी तालुक्यातील रानबोथली येथील अमृता संदिप मरस्कोल्हे ही आपल्या आजी सोबत शेतावर गेली असता तिला शौचास लागल्याने ती बाहेर गेली व ती शौच धुण्याकरीता जवळ असलेल्या गोसीखुर्द कालव्याजवळ गेली. कालव्यातील पायऱ्या उतरत असताना तिचा तोल गेल्यामुळे ती पाण्यात पडली. सदर घटनेची माहिती मिळतात गावातील लोकांनी कालव्याकडे धाव घेऊन नहरातील पाण्यात शोध घेतला असता अमृता मृत अवस्थेत आढळून आली.

सदर घटनास्थळाचा पंचनामा ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनचे उपपोलिस निरीक्षक सुरेंद्र उपरे, पोलीस हवालदार धनरे, पो. ह. दुपारे यांनी करून शव ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येते उत्तरिय तपासणी साठी पाठविण्यात आले.
सदर घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.