एकाच कामाचे करारनामे दोन एजंशीच्या नावाने

जानाळा ग्राम पंचायतचा अफलातुन कारभार

मूल (प्रतिनिधी) : तालुक्यातील आगडी येथे 2515 जिल्हा निधी अंतर्गत सिमेंट क्रॉकिट रस्त्याचे काम अतिशय निकृष्ठ दर्जाचे करण्यात आले होते, सदर काम जिल्हा परिषदेने ग्राम पंचायत सोबतच 25 फेब्रुवारी रोजी करारनामा केला असतानाही त्याच कामाचे जानाळा ग्राम पंचायतने 29 एप्रिल 2022 रोजी एका कंत्राटदाराच्या नावाने करारनामा केल्याचे प्रकरण पुढे आले असुन नियमाला डावलुन करारनामा करणाÚयांवर कारवाई करण्याची मागणी जानाळाचे माजी उपसरपंच मनोज जांभुळे यांनी केले आहे.

मूल तालुक्यातील मौजा आगडी येथील चंद्रगुप्त लेनगुरे ते बापु केस्तावार, निलकंठ वाढई ते गजानन किन्नाके, निलकंठ वाढई ते तानुजी निकोडे यांच्या घरापर्यंत 2515 जिल्हा निधी अंतर्गत सिमेंट कॉंक्रिट रस्त्याचे काम अतिशय निकृष्ठ दर्जा करण्यात आले, याबाबत संबधित यंत्रणेकडे तक्रार करून सदर कामाची चौकशी करण्याची मागणी केली असता सदर ग्राम पंचायतच्या नावाने करारनामा असलेले काम, मूल येथील एका कंत्राटदाराच्या नावाने त्याच कामाचे करारनामा करून घेण्यात आले असुन त्याकामाचे आर ए बिल सुध्दा करण्यात आलेले आहे.

सदर कामाची तक्रार जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांचेकडे केली असता त्यांनी संबधीत अभियंत्यांना कामाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले, यावरून सदर कामाची चौकशी केली असता कामात अनेक त्रृटया असल्याचे निष्पण झाले आणि त्याबाबत संबधित अभियंत्याने सरपंच/सचिव ग्राम पंचायत जानाळा यांना 28 जुन रोजी पत्र देवुन त्रुटया तात्काळ पुर्ण करण्याचे आदेश दिले, दरम्यान ग्राम पंचायतनी कंत्राटदाराच्या नावाने करारनामा केला असतानाही संबधीत कनिष्ठ अभियंत्यानी ग्राम पंचायतच्या सरपंच आणि सचिवांना पत्र देण्याची गरज का? किंवा ग्राम पंचायतने केलेला तो करारनामा बोगस आहे काय असा प्रश्न आता सामान्य नागरीकांना पडला आहे. सदर करारनाम्याची चौकशी करून एकाच कामाचे दोन करारनामे कोणत्या नियमानुसार करण्यात आले याची चौकशी करून संबधीत सरपंच, सचिवांवर कारवाई करण्याची मागणी माजी उपसरपंच मनोज जांभुळे यांनी केले आहे.

याबाबत जानाळा ग्राम पंचायतचे ग्रामसेवक धिरजकुमार बोरकर यांच्याशी संपर्क साधला असता होवु शकला नाही