वाघाच्या हल्यात एक जण ठार tiger attack

tiger attack
tiger attack

मूल तालुक्यातील भादुर्णा बिटातील घटना

संगिता गेडाम, मूल
तेंदुपत्ता तोंडणीसाठी जंगलात गेलेल्या एका इसमावर दबा धरून बसलेल्या वाघाने झडप घेवुन ठार केल्याची घटना बफर क्षेत्रातील भादुर्णा नंबर 2 कक्ष क्रं. 324 मध्ये गुरूवारी (ता. 9) सकाळी 6 वाजता दरम्यान घडली. तुळशिराम सुरेश सोनुले वय 34 वर्षे रा. रत्नापूर असे वाघाच्या हल्यात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. Tulshiram Sonule

मूल तालुक्यात रोजगाराचे कोणतेही साधन नसल्याने मिळेल तो काम करून आपली उपजिवीका नागरीक करीत आहे, सध्या तेंदुपत्ता तोडणींच्या हंगामाला सुरूवात झालेली आहे. मूल तालुक्यात मोठया प्रमाणावर जंगलव्याप्त परिसर आहे. त्यामुळे मूल तालुक्यातील रत्नापूर येथील जवळपास 15 जण तेंदुपत्ता तोडणीसाठी बफर क्षेत्रातील भादुर्णा नंबर 2 येथील कक्ष क्रंमांक 324 मध्ये गेला होता. दरम्यान दब्बा धरून बसलेल्या वाघाने तुळशिराम सुरेश सोनुले वय 34 वर्षे याच्यावर हल्ला करून जागीच ठार केला. नागरीकांनी आरडाओरड करून घडलेल्या घटनेची माहिती वनविभागाला दिली. tiger attack

मूल येथील वनविभागाच्या बफर क्षेत्राचे वनपरिक्षेत्राधिकारी राहुल कारेकर, क्षेत्र सहा. पाकेवार, मूल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांनी घटनास्थळाला भेट देवुन पंचनामा केला. वनविभागाने मृतकाच्या कुटुंबियाना 20 हजार रूपयाची आर्थीक मदत केली. मृत्तकाच्या पश्चात पत्नी 2 मुली आणि 1 मुलगा आहे. Ratnapur in Mul Taluka