मूल येथील मालधक्क्यावर वाहतूक वाढल्यास पर्यायी व्यवस्था Alternative arrangements

Alternative arrangements in case of increased traffic on the freight line at Mul
Alternative arrangements in case of increased traffic on the freight line at Mul

खासदार बाळू धानोरकर यांनी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या बैठकीत विविध विषय मांडले

चंद्रपूर (प्रतिनिधी) : लोकसभा क्षेत्रातील अनेक गंभीर प्रश्न मार्गी लावण्याकरीता खासदार बाळू धानोरकर हे नेहमी लोकसभेत आवाज उचलत असतात. नागपूर येथे नुकत्याच झालेल्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या South East Central Railway बैठकीत त्यांनी विविध विषय उपस्थित करीत तात्काळ मार्गी काढण्याच्या सूचना रेल्वे महाप्रबंधक यांना केल्या. त्यासोबतच या समस्या दिल्ली येथे संबंधित अधिकारी व केंद्रीय रेल्वेमंत्री यांच्या उपस्थितीत मार्गी लावणार असल्याचे खासदार बाळू धानोरकर MP Balu Dhanorkar यांनी सांगितले.Alternative arrangements in case of increased traffic on the freight line at Mul

यावेळेस खासदार कृपाल तुमाने MP krupal Tumane, खासदार अशोक नेते MP Ashok nete, महाप्रबंधक दक्षिण- पूर्व – मध्य रेल्वे बिलासपूर, मंडल रेल प्रबंधक नागपूर यांची उपस्थिती होती.

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे कर्मवीर महाविद्यालय शाळेच्या पटांगणा जवळ रेल्वे यार्ड मालधक्का उभारण्यात आला. या यार्ड मुळे येथील विद्यार्थी व मूल येथील रहिवाशी यांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे हा रेल्वे यार्ड मालधक्का इतरत्र हलविण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली होती. त्याची दखल घेत रेल्वे प्रशासन या मालधक्क्यावर अत्यंत तुरळक लोडींग – अनलोडींग असून पर्यायी जागेचा देखील शोध सुरु असल्याचे सांगितले.

चंद्रपूर शहरातून ग्रामीण भागात जोडण्याकरिता चांदा फोर्ट रेल्वे स्टेशन महत्वाचा दुवा आहे. या भागातून प्रतिदिन हजारो प्रवासी प्रवास करतात. परंतु चांदा फोर्ट रेल्वे स्टेशन येथे भौतिक व सुरक्षा व्यवस्थेच्या अभाव असल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे खासदार बाळू धानोरकर यांनी वारंवार पत्रव्यवहार करून येथे सुविधा उपलब्ध करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता दोन आरपीएफ सुरक्षारक्षक, ११ एलईडी लाईट, रेल्वे स्थानकावर जाणाऱ्या मार्गावर १९ स्टीट लाईट, प्लेटफॉर्म वर ३० एलईडी लाईट, त्यासोबतच इतर ठिकाणी देखील एलईडी लाईट व १७ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे. यामुळे या स्थानकावरील सुरक्षेचा प्रश्न दूर होणार आहे.

तसेच दक्षिण – पूर्व – मध्य रेल्वे द्वारा बिलासपूर – चेन्नई सेंट्रल १२८५१/१२८५२ ला चांदा फोर्ट येथे स्टॉपेज, जबलपूर – चांदा फोर्ट ट्रेन न.०२२७४/ ०२२७३ ला चांदा फोर्ट ऐवजी बल्लारपूर रेल्वे स्थानकापर्यंत विस्तारित करणे, इत्यादी विषय या बैठकीत मांडले. या सर्व प्रस्तावांचा रेल्वे बोर्डाकडे योग्य पाठपुरावा न केल्याबद्दल खासदार बाळू धानोरकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दिल्ली येथे लवकरच अधिकारी व संबंधित खासदारांसह रेल्वे मंत्र्याकडे बैठकीचे आयोजन करणार असल्याचे म्हंटले.