राजोलीमध्ये हातपंपाचे भुमिपुजन Bhumipujan of hand pump in Rajoli

Bhumipujan of hand pump in Rajoli
Bhumipujan of hand pump in Rajoli

माजी उपसभापती वल्केवार यांच्या प्रयत्नातुन हातपंप मंजुर

मूल (प्रतिनिधी) : दिवसेंदिवस पाण्याची समस्या तिव्र होत असल्याने पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीमधुन राजोली ग्राम पंचायतच्या Gram Panchayat Rajoli  वार्ड क्रं. 2 मध्ये हातपंपाचे भुमिपुजन सरपंच जितेंद्र लोणारे, माजी उपसभापती गजानन वल्केवार आणि जयश्री वल्केवार यांच्या हस्ते करण्यात आले. Bhumipujan of hand pump in Rajoli

मूल तालुक्यातील मौजा राजोली ग्राम पंचायतच्या वतिने पंधरा व्या वित्त आयोगातुन मंजुर झालेल्या निधी मधुन राजोली येथील वार्ड नं. 2 मध्ये गुरुदेव सेवा मंडळाजवळ हातपंपाचे भुमिपुजन पार पडले. वार्डात पाण्याची समस्या निर्माण होवु नये यासाठी ग्राम पंचायतने पंचायत समितीकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे माजी उपसभापती जयश्री वल्केवार यांच्या प्रयत्नातुन पंधरा व्या वित्त आयोग मधुन निधी मंजुर झाली होती. दरम्यान हातपंपाचे भुमिपुजन राजोली ग्राम पंचायतचे सरपंच जितेंद्र लोणारे, पंचायत समितीचे माजी उपसभापती गजानन वल्केवार, जयश्री वल्केवार, वार्डाच्या सदस्या पल्लवीताई श्याम पुठठावार यांच्या हस्ते विधीवत पुजन करून कामाला सुरूवात सुरूवात करण्यात आले. यावेळी सदस्य रामभाऊ कोटरंगे, सुनिल गुज्जनवार, बटी निकुरे, चंदु नामपल्लीवार, सामाजिक कार्यकर्ते श्याम पुठावार, गजु पा ठिकरे, निखिता खोब्रागडे, ग्राम विकास अधिकारी राजेंद्र येरमे, विलास आत्राम उपस्थित होते.