एक जण गंभीर जखमी
सावली (प्रतिनिधी) : येथून ४ किमी अंतरावर असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या टोल नाक्याला दुचाकीने धडक दिल्याने एक इसम ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना (दि.18) ला रात्री च्या सुमारास घडली. राकेश तूमदेव नवघडे वय (३२). वर्षे रा.बारसागड, याचा जागीच मृत्यू झाला तर अमोल जनार्दन चौधरी वय ३० वर्षे रा. बारसागड असे गंभिर जखमीचे नाव आहे.
दोघेही आपल्या दुचाकी क्र .एम एच 34 वी 7520 या दुचाकीने मार्कंडा येथे गेले होते.आपल्या स्वागावी परतत असताना राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या टोल नाक्याला दुचाकीने जोरदार घडक दिल्याने राष्ट्रिय महामार्ग टोल नाक्यावर मोठा अपघात घडला.
घटनेची माहिती पोलिस होताच घटनास्थळ गाठून जखमींना सावली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने जखमी इसमास गडचिरोली सामान्य रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले. पुढील तपास सुरु आहे.