आनंदवनात पत्रकारांचा कौटुंबिक स्नेहमिलन सोहळा Family ceremony of journalists

Anandavan
Anandavan

व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने काढण्यात येणार १० लाखाचा विमा

वरोरा (प्रतिनिधी) : व्हॉइस ऑफ मीडियाच्या Voice of Media वतीने आनंदवनात Anandavan रविवार २ एप्रील रोजी पत्रकारांचा कौटुंबिक स्नेह मिलन सोहळाचे आयोजन करण्यात आले आहे. Family ceremony of journalists

या आयोजित सोहळ्याला व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा मार्गदर्शक संदीप काळे, ग्रामीण प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, कार्यालयीन राष्ट्रीय सचिव दिव्याजी भोसले, विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक, आणि सामाजिक उपक्रम समितीचे सामाजिक कार्यकर्ते तथा राज्य प्रमुख आनंद आंबेकर उपस्थित राहणार असुन ज्येष्ठ कार्यकर्ते तथा आनंदवनचे प्रमुख विकास आमटे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

आनंदवनचे प्रमुख विकास या सोहळ्या दरम्यान आनंदवन निर्मित ऑर्केस्ट्रा स्वरानंदवन चे सादरीकरण होणार असुन व्हॉइस ऑफ मीडियाच्या पत्रकारांच्या परीवारासाठी खास करून महिला व बच्चा कंपनीकरीता करण्यात आले आहे. रविवार
विविध स्पर्धांचे आयोजन २ एप्रील २०२३ रोजी सकाळी १० वा. पासुन स्नेहमिलन सोहळ्याला प्रारंभ होणार आहे . या सोहळ्या दरम्यान प्रत्येक सदस्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा यावेळी विमा काढला जाणार आहे.

या मेळाव्याला तालुक्यातील सर्व सदस्यांनी कुटुंबासह उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हाध्यक्ष संजय पडोळे, चंद्रपूर शहराध्यक्ष सारंग पांडे, सोहळा संयोजक समिती प्रा.डाँ. यशवंत घुमे, कार्याध्यक्ष अनिल पाटील, संघटक चेतन लुतडे, तालुकाध्यक्ष तथा सर्व पदाधिकारी वरोरा तालुकाच्या वतीने करण्यात आले आहे.