महात्मा गांधीनी सांगितलेल्या मार्गाचा अवलंब करा… नामदार मुनगंटीवार Follow the path suggested by Mahatma Gandhi

District Guardian Minister Namdar Sudhir Mungantiwar
District Guardian Minister Namdar Sudhir Mungantiwar

स्वातंत्र्यविर सावरकर गौरव यात्रेदरम्यान नामदार मुनगंटीवारांचे वक्तव्य

मूल (प्रतिनिधी) : बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांना या यात्रेच्या निमीत्तयाने महात्मा गांधीने सांगितले देशातुन कॉंग्रेस विसर्जीत करा, हे छोटेसे काम आपल्याला करण्याची जबाबदारी देत असुन ते काम आपण पुर्ण कराल असे मत राज्याचे वन, सांस्कृतीक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. District Guardian Minister Namdar Sudhir Mungantiwar ते मूल येथील गांधी चौकात आयोजीत केलेल्या स्वातंत्र्यविर सावरकर गौरव यात्रेच्या सभेत बोलत होते.. Follow the path suggested by Mahatma Gandhi… Namdar Mungantiwar

यावेळी भाजपाचे जिल्हा अध्यक्ष देवराव भोंगळे, माजी जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, जिल्हा सरचिटणीस नामदेव डहुले, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संध्याताई गुरनुले, मूल नगर परिषदेच्या माजी अध्यक्ष रत्नमाला भोयर, माजी उपाध्यक्ष नंदु रणदिवे, मूल पंचायत समितीचे माजी सभापती चंदु मारगोनवार, शहराध्यक्ष प्रभाकर भोयर, शहर सरचिटणीस चंद्रकांत आष्टणकर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे उपस्थित होते.

या देशाचे स्वतःला प्रधानमंत्री पदाचे उमेदवार समजणारे राहुल गांधी हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात ही बाब असहनिय आहे.स्वातंत्र्यवीर सावरकरांना तुम्ही भित्रा म्हणता, भित्रे तुम्ही आहात, ब्रिटनमध्ये शिकायला गेले तेव्हा आपलं नाव राहुल गांधी बदलून राहुल विंची केले. हा इतिहास आहे. तुम्ही आता म्हणता मी सावरकर नाही. गांधी आहो, हे सत्य नसून तुम्ही सावरकर नाही, गांधी पण नाही, राहुल विंची आहात. वीर सावरकर देशभक्त तर राहुल गांधी भित्रे आहेत अशी टीका सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली

सभेचे संचालन प्रविण मोहुर्ले यांनी केले तर उपस्थितांचे आभार शहराध्यक्ष प्रभाकर भोयर यांनी मानले. सदर गौरव यात्रेत मोठया संख्येने नागरीक उपस्थित होते.