रेल्वे लाईनच्या कामामुळे मूल-चंद्रपूर मार्गामध्ये बद्दल Mul-Chandrapur Road

Railways in the South East
Railways in the South East

मंडल अभियंताचे मूल पोलीस स्टेशनला पत्र

मूल (प्रतिनिधी) : रेल्वे लाईनच्या लेवल क्रासींगच्या कामांमुळे शुक्रवार पासुन तर रविवार पर्यंत रात्रौच्या वेळात चंद्रपूर मार्गामध्ये बदल करण्यात आले असुन याबाबतचे पत्र दक्षिण पुर्व मध्य रेल्वे नागपूरचे मंडळ अभियंता (दक्षिण) यांनी मूल पोलीस स्टेशनला दिले आहे, यामुळे मूल पोलीस स्टेशन कडुन पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार असल्याची माहिती मूल पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांनी कळविले आहे. Railways in the South East

दक्षिण पुर्व मध्ये रेल्वेच्या मौजा राजोली, मूल, मारोडा दरम्यान रेल्वे लाईनचे लेवल क्रासींगचे काम 8 जुन ते 10 जुन रोजी करण्यात येणार आहे, काम करीत असतांना रात्रौ 20.00 ते सकाळी 8.00 वाजता दरम्यान चंद्रपूर मार्ग बंद करण्यात येणार आहे. यामुळे सदर मार्गावरून प्रवास करणाÚया प्रवाश्यांना मूल, ताडाळा, चिचाळा, हळदी, दहेगांव, नलेश्वर, चिरोली, जानाळा, चंद्रपूर यामार्गाने वळविण्यात येणार असल्याची माहिती मूल पोलीस स्टेशनच्या वतिने देण्यात आली आहे. Mul Police Station