सर्पदंशाने मुलीचा मृत्यू : डॉक्टरांच्या शर्तीच्या प्रयत्नाला शेवटी अपयश snakebite

Jayshri Dhagdi
Jayshri Dhagdi

डॉक्टराने दिले तिला ४८ तास; पण काळाने २४ तासातच साधला डाव

बल्लारपूर (प्रतिनिधी): गावात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाची सांगता मोठ्या थाटा माटात सुरू होते आणि एका विषारी नागाने एका मुलीला दंश देवून आनंदाच्या वातावरणात विष पेरले तिला तात्काळ चंद्रपूर येथे शासकीय वैद्यकीय रुग्णालयात हलवले असता; डॉक्टराने ४८ तासाचा अवधी दिला पण काळाने २४ तासातच आपला डाव साधला व तिचा मृत्यूशी झुंज अखेर संपला. ही दुर्दैवी घटना बल्लारपूर Ballarpur  तालुक्यातील विसापूर Vishapur येथे १५ ऑगस्ट रोज मंगळवरला दुपारी १२ वाजता घडली व आज बुधवारला दुपारी १२ वाजता ती मृत पावली. मृत पावलेल्या मुलीचे नाव जयश्री हरिचंद्र धगडी (१३ वर्ष) Jayshri Dhagdi असून तिच्या जाण्याने गावात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. Girl dies of snakebite

जयश्री बाथरूम / वॉशरूम जवळ गेली असता भक्षाच्या शोधत दबा धरून बसलेल्या विषारी नागाने तिला दंश केला ती ओरडतच बाहेर निघाली वडिलांनी व शेजारीच असणारे सुभाष भटवलकर यांनी क्षणाचा विलंब न लावता तिला शेजारच्या मदतीने चंद्रपूरला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात हलविले.तिथे तिच्यावर शर्तीचे उपचाराचे प्रयत्न सुरू झाले. तिचा दोनदा हृदय गती बंद पडली; पण प्रकृती आणखीनच खालवली होती.अशातच भटवलकरनी डॉक्टर धगडी यांना फोन करून बोलवून घेतले त्यांनी सुद्धा कसोशीचे प्रयत्न करून बंद पडलेली हृदय गती सुरू केली. त्यांनी सर्वोत्तम उपचार केला परंतु तिच्या मेंदूने पूर्वी सारखी प्रतिक्रिया देणे बंद केली. शेवटी मेंदू तज्ञ खाजगी डॉक्टरकडे तिला हलविण्यात आले त्यांनी सुद्धा शर्तीचा प्रयत्न करू केला तिला अतिदक्षता रूम मध्ये व्हेंटिलेटर ठेवण्यात आले कधी तब्येत स्थिर कधी अतिशय धोका दायक असे सुरू होते. त्यातच जोखमीचे ४८ तास आहे असे डॉक्टरांनी सांगितले होते. परंतु तिचा २४ तासातच मृत्यूची झुंज संपला व दुसऱ्या दिवशी बुधवार १६ ऑगस्टला दुपारी १२ वाजता जयश्रीची प्राणज्योत मालवली.

आई वडिलांची लाडकी लेक शिक्षणात हुशार मुलगी अशी चुणूक लावून काळाच्या पडद्या आड गेली. तिच्या जाण्याने वडील हरीचंद्र धगडी आपल्या देखत आपली मुलगी गेली आपण निकारीच प्रयत्न करूनही वाचवू शकलो नाही या भावनेने एक शून्य नजरेने तिच्या देहाकडे पाहतच होते व ते दृश्य बघून विसापूरकरांचे डोळे पाणावले.