चाकु हल्लात एक जण गंभीर जखमी knife attack

knife attack
knife attack

चाकु हल्लात एक जण गंभीर जखमी
मूल तालुक्यातील घटना

मूल (प्रतिनिधी): जुन्या वादातुन एका 19 वर्षीय मुलावर चाकु हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना मूल Mul  तालुक्यातील गडीसुर्ला Gadisurla येथे गुरूवारी रात्रौ 8.30 वाजता दरम्यान घडली. सुजल विनोद बुबडे वय 19 वर्षे रा. गडीसुर्ला असे गंभीर जखमी मुलाचे नांव आहे तर भुषण राजु चचाणे वय 19 वर्षे, गणेश अशोक शेंडे वय 19 वर्षे रा. मूल असे आरोपीचे नांव आहे. The seriously injured boy is named as Sujal Vinod Bubde and the accused is named as Bhushan Raju Chachane, Ganesh Ashok Shende

पोलीस सुत्राकडुन मिळालेल्या माहितीनुसार मूल तालुक्यातील गडीसुर्ला येथील सुजल विनोद बुबडे रा. गडीसुर्ला हा मूल येथे आपल्या आजीकडे राहुन शिक्षण घेत होता, दरम्यान गुरूवारी तो गडीसुर्ला येथे गेला होता, रात्रौ 8.30 वाजता दरम्यान तो गावातील पाण्याच्या टाकीजवळ असताना मूल येथील भुषण राजु चचाणे वय 19, गणेश अशोक शेंडे वय 19 वर्षे यांनी त्यांच्यावर धारदार चाकुने पाठीवर आणि पोटावर हल्ला करून गंभीर जखमी केले. जखमी सुजल बुबडे यांला मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात प्राथमिक उपचार करून चंद्रपूर येथे हलविण्यात आले. मूल पोलीस घटनास्थळावर पोहचुन घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपींना अटक केली आहे. knife attack

आरोपींवर भांदवी कलम 307 (34) अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लिकाअर्जुन इंगडे, पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हरिश्चंद्र मोरे करीत आहे.