राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष नेहमीच महिलांच्या पाठीशी : नितीन भटारकर Nationalist Congress Party with women

Nationalist Congress Party with women
Nationalist Congress Party with women

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हळदीकुंकू स्नेहमिलन सोहळयात आवाहन

मूल (प्रतिनिधी): सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात महिला स्वावलंबी व्हावे यासाठी शासनस्तराव अनेक योजना राबविल्या जात आहेत, त्यायोजनेचा लाभ आपण घ्यायला पाहिजे, काही अडचणी उद्भवल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याशी संपर्क करा, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष नेहमी आपल्या पाठीशी राहील असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर nitin Bhatarkar यांनी केले. महिला राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी मूल, तालुका आणि शहरच्या वतिने बुधवारी दुपारी 1 वाजता आयोजीत केलेल्या हळदीकुंकु कार्यक्रमात ते बोलत होत. Mul

Nationalist Congress Party with women1
Nationalist Congress Party with women1

मूल येथील दर्पण सार्वजनिक वाचनालयात पार पडलेल्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्ष रंजनाताई पारशिवे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हाध्यक्ष पंकज ढेंगडे, महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा कार्याध्यक्ष अर्चनाताई बुटले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष मंगेश पोटवार, मूल शहराध्यक्ष आकाश येसनकर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रोहीत कामडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या सोनालीताई पोटवार, ओबीसी आघाडीचे तालुका अध्यक्ष वासुदेव पिपरे, तालुका उपाध्यक्ष महेंद्र गोंगले, तालुका सरचिटणीस प्रशांत मेश्राम उपस्थित होते. Ranjana Parshivne, Pankaj Dhengde, Mangesh Potwar, akash Yeshankar, Rohit Kamde, Sonali Potwar, Wasudev Pipre, Mahendra Gongle, Prashant Meshram

राजमाता आई जिजाऊ, त्यागमूर्ती माता रमाई, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. उपस्थित महिलांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका पदाधिकाऱ्यांनी उपस्थित महिलाना हळदकुंकू लावून भेट वस्तू भेट दिले. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष रंजना पारशिवे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मूल तालुकाध्यक्ष मंगेश पोटवार यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.

मेळाव्याचे प्रास्ताविक महिला तालुकाध्यक्ष संगीता गेडाम यांनी केले, संचालन धारा मेश्राम यांनी केले तर उपस्थितांचे आभार पुर्णवी कामडे यांनी मानले. मेळाव्याच्या यशस्वीयतेसाठी माला शेंडे, प्रज्ञा कुंभारे, लिला येसनकर, भारती खोब्रागडे, दितांशी मेश्राम, सिमा चिकाटे, अनिता खोब्रागडे यांनी अथक परिश्रम घेतले.