इशान राचर्लावार 96.4 टक्के गुण मिळवुन तालुक्यात प्रथम St. Ann’s Public School Mul

St. Ann's Public School Mul
St. Ann's Public School Mul

सेंट अँन्स पब्लिक स्कुलचा 100 टक्के निकाल

मूल (प्रतिनिधी): केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षांचा निकाल सोमवारी (ता. 13 मे) जाहीर करण्यात आला. मूल येथील सेंट अँन्स पब्लिक स्कुलचा 100 टक्के निकाल लागला असुन येथील इशान संतोष राचर्लावार Ishan Rachrlawar या विद्यार्थ्यांने 96.4 टक्के गुण मिळवुन तालुक्यातुन प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. तर संकेत कोल्हे आणि अवंनी देशमुख यांनी 95.6 टक्के गुण मिळवुन तालुक्यातुन दुसरे आले आहे. St. Ann’s Public School Mul

St. Ann's Public School Mul1
St. Ann’s Public School Mul1

मूल येथील सेंट अँन्स पब्लिक स्कुल येथील 20 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती, यामध्ये 90 टक्केच्या वर 9 विद्यार्थी, 80 टक्के च्या वर 7 विद्यार्थी आणि 70 आणि 60 टक्के 2-2 विद्यार्थी उतीर्ण झाले. इशान राचर्लावार यांने गणित विषयात 100 पैकी 100 गुण प्राप्त केलेले आहे. CBSE Result Class 10th 2024

प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचे सेंट अँन्स पब्लिक स्कुलच्या मुख्याध्यापीका सिस्टर आशा सेबॅस्टियन, सिस्टर फ्रिडा जोशी, सिस्टर लिंडा अँटॉनी, सारिका चिलबुले, अर्शी सय्यद, हॅनी प्रसाद यांनी अभिनंदन केले.