केळझर येथील घटना
संगिता गेडाम, मूल : जनावरांना चराईसाठी जंगलात घेवुन गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास केळझर क्षेत्रात घडली. Chandrapur Kelzar Forest रात्रौ घरी परत न आल्याने वनविभागाने राबविलेल्या मोहीमेत गुराख्याचे मृतहेद वनविभागाच्या केळझर येथील कक्ष क्रमांक 431 मध्ये आढळुन आला. गणपत लक्ष्मण मराठे वय 60 वर्षे केळझर असे गुराख्याचे नांव आहे. Cowherd killed in tiger attack
मूल तालुक्यातील केळझर येथील गणपत लक्ष्मण मराठे वय 60 वर्षे हे नेहमी प्रमाणे गुरे चराईसाठी नेत होते. शुक्रवारी सकाळी केळझर येथील कक्ष क्रं. 431 येथे गुरे नेले असता दबा धरून बसलेल्या वाघाने गुराख्यावर हल्ला करून ठार केले. दरम्यान रात्रौ होवुन घरी परत न आल्याने गुराख्याच्या पत्नीने गावात माहिती दिली, वनविभागाने शनिवारी सकाळी शोध मोहिम राबविली असता गणपत मराठे यांचा मृतदेह केळझर येथील कक्ष क्रं. 431 मध्ये आढळुन आला. चिचपल्ली वनविभाग व पोलीस प्रशासनामार्फत घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. Ganpat Laxman Marathe
मृतक गुराखी गणपत मराठे याच्या पत्नीला चिचपल्लीच्या वनपरिक्षेत्राधिकारी प्रियंका वेलमे यांच्या हस्ते तात्काळ ३० हजार रूपयाची आर्थीक मदत देण्यात आली. यावेळी चिचपल्लीचे क्षेत्र सहा. पि. डब्लू. पडवे, महादवाडीचे क्षेत्र सहा. पि. डी.खनके, संजिवन पर्यावरण संस्थेचे उमेशसिंह झिरे, जानाळा येथील वनरक्षक आर. जी गुरनुले, ताडाळा येथील वनरक्षक एम. आर. वाघमारे सुशीच्या वनरक्षक शितल बेंदले उपस्थित होते.