मूल (प्रतिनिधी) : औद्योगिक क्षेत्रासाठी कार्य करणाÚया चंद्रपूर जिल्हा ग्रामीण कॉंग्रेस कमेटी औद्योगिक सेलच्या जिल्हा उपाध्यक्षपदी दत्तात्रय समर्थ यांची नियुक्ती प्रदेश कॉंग्रेस कमेटी औद्योगिक सेलचे अध्यक्ष डॉ. हेमंत श्याम सोनारे यांनी नुकतीच केली आहे. Dattatraya Samarth as District Vice President of Industrial Cell
चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणुन सर्वत्र परिचीत आहे, याच जिल्हयाला ब्लॉक सिटी म्हणुनही ओळखले जाते, जिल्हात मोठया प्रमाणावर कामगार वर्ग असल्याने याठिकाणी कामगाराच्या मोठया समस्या आहेत, कामगाराचे प्रलंबित प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने चंद्रपूर जिल्हा ग्रामीण कॉंग्रेस कमेटी औद्योगिक सेलच्या जिल्हा उपाध्यक्षपदी दत्तात्रय समर्थ यांची नियुक्ती प्रदेश कॉंग्रेस कमेटी औद्योगिक सेलचे अध्यक्ष डॉ. हेमंत श्याम सोनारे Dr. Hemant Shyam Sonare यांनी नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमेटी औद्योगिक सेलचे सचिव विजय नळे Vijay Nale यांनी श्री. समर्थ यांना नियुक्ती पत्र देवुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिले.
सामान्य जनतेच्या प्रलंबित असलेल्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया नवनियुक्त जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय समर्थ यांनी व्यक्त केले.









