भोजराज गोवर्धन, मूल
राज्याचे हेवीवेट नेते, माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार गेल्या काही दिवसांपासुन ज्यापध्दतीने संभ्रमीत करणारे व्यक्तव्य करीत आहेत त्यावरून मुनगंटीवारांच्या मनात नेमक आहे तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अतिशय कमी वयात राजकारणात प्रवेश केलेल्या आमदार मुनगंटीवार यांनी भारतीय जनता पार्टी मधील महत्वाचे पद भुषवुन त्याला न्याय सुध्दा दिलेत, इच्छा नसतांनाही पक्षांनी त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली, त्यांचा लोकसभेत पराभव झाला, परंतु विधानसभा निवडणुकीत त्यांनी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातुन हजारो मते घेऊन विजयी झाले, राज्यात भाजपा-सेना-राष्ट्रवादीची सत्ता स्थापन झाली, आमदार मुनगंटीवारांना चांगले मंत्रीपद मिळेल अशी आशा कार्यकर्त्यांना होती, मात्र मंत्रीमंडळामध्ये त्यांना स्थान देण्यात आलेले नाही, अनेक दिवस त्यांना मंत्रीपदाचे केवळ गाजर दाखविण्यात आले परंतु वर्षे लोटुन गेला मात्र अजुनही मुनगंटीवारांना मंत्रीपद देण्यात आले नाही.
दरम्यान मुनगंटीवारांनी गेल्या काही दिवसांपासुन घेतलेली भुमिका सर्वांना आश्चर्यचकीत करणारी दिसत आहे. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे स्वपक्षातील नेत्यांनाच टार्गेट केल्याचे दिसुन आले. कधीही धमकी न देणारे आमदार मुनगंटीवार आता धमकी देण्याची भाषा बोलू लागले, पक्षातील नेत्याबद्दल ठोस भुमीका घेणारे मुनगंटीवार यांनी शनिशिंगणापूर नंतर चंद्रपूर असा जिल्हा आहे की ज्यामध्ये भाजपात पक्षप्रवेश करण्यासाठी कुठलेही दरवाजे नाही, महानगर पालीकेची निवडणुक होवु दया, 16 तारखेनंतर चंद्रपूर महानगर पालीकेच्या निवडणुकीतील एबी फार्म चोरी प्रकरणाचे ऑपरेशन करू असेही ते म्हणाले.
मूल नगर पालीकेच्या निवडणुकीत भाजपाचा दारूण पराभव झाला, हे मुनगंटीवारांच्या जिवारी लागण्यासारखेच आहे, मूल शहराला स्मार्टसिटी बनविण्यासाठी करोडो रूपयाचा निधी खेचुन आणले, व विकासकामे केली त्याच शहरातुन भाजपा उमेदवारांना पराभव पाहायला मिळत असल्याने त्यांची नाराजी स्वाभावीक आहे, परंतु ती नाराजी बोलुन बाहेर काढतील असे वाटत नव्हते, नुकत्याच महानगर पालीकेच्या प्रचारादरम्यान बोलतांना आमदार मुनगंटीवार यांनी मूल नगर पालीकेत कॉंग्रेसची सत्ता आली, मुख्याधिकाऱ्यांनी स्वच्छतेच्या कंत्राट 31 डिसेंबर रोजी पुर्णत्वास येणार असल्याचे सांगीतले, मी त्यांना सांगीतले आता कॉंग्रेसची सत्ता आहे, नगरसेवकांना झाडु देवुन स्वच्छता करण्यास सांगा असे म्हटल्याचेही ते सांगितले.
मूल नगर पालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या भाजपा उमेदवार किरण कापगते यांनाही मूलच्या 5 हजार 873 मतदारांनी मते दिलीत, त्यामतदारांचा विचार करून आमदार मुनगंटीवार क्षेत्राच्या विकासासाठी निधी कमी पडु देणार नाही अशी अपेक्षा मतदारांना आहे, मुनगंटीवार हे या क्षेत्राचे आमदार आहेत त्यांच्याकडून जनतेच्या खूप मोठ्या अपेक्षा आहे परंतु गेल्या काही दिवसापासून त्यांच्या तोंडून जे व्यक्तव्य बाहेर येत आहे त्यामुळेे त्यांच्या मनात नेमक आहे तरी काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.









