नगर पालिकेचे दुर्लक्ष
मूल (प्रतिनिधी) : मूल नगर पालीका क्षेत्रातील खुल्या लेऑऊटवर ग्रिन जिम तयार करण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे, सदर ग्रिन जिमचे काम अतिशय निकृष्ठ दर्जाचे होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. 
शहरातील नागरीकांना योगासोबतच व्यायामाची सवय लागावी यासाठी, जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयातील एका फंडातुन लाखो रूपये खर्च करून मूल नगर पालीका क्षेत्रातील लेऑऊट मधील जवळपास 15 खुला पटागणावर ग्रिन जिमचे काम काही दिवसापासुन सुरू आहे, याठिकाणी व्यायम करण्याचे वेगवेगळे 12 साहित्य लावण्यात येत असुन सदर साहित्य उभे करण्यासाठी 2 फुट खोल खड्डा खोदण्यात आलेला आहे, त्याठिकाणी साहित्य लावण्यासाठी लोखंडी पाईप लावण्यात आलेला असुन केवळ 8 एम एम असलेल्या सलाख वापरण्यात आलेली आहे, उभ्या असलेल्या पाईपला पेंट सुध्दा मारण्यात आलेला नसल्यामुळे सदर साहित्य काही दिवसात जंग खाण्याची शक्यता नाकारता येत नाही, पाईप उभे करण्यासाठी क्रॉक्रिटचा वापर करण्यात आलेला आहे, ज्यादिवशी क्रॉक्रिट टाकण्यात आले, त्यादिवशीपासुन त्याठिकाणी पाणी सुध्दा टाकण्यात आलेले नाही, यामुळे कामाच्या दर्जा निकृष्ठ होत असल्याचा आरोप होत आहे. सदर काम करणारे कंत्राटदार केवळ मलाईखाल्यासाठी काम करीत असल्याचा आरोपही नागरिकांककडून होत आहे. Mul Municipal Council
ग्रिन जिम असतांनाही केवळ मलाईसाठी कंत्राट
मूल नगर पालीका क्षेत्रातील अनेक ठिकाणी आधीच ग्रिन जिमचे काम झालेले आहे, त्याठिकाणी साहित्य सुध्दा व्यवस्थीत आहे, असे असतांनाही मूल नगर पालीकेने त्याचठिकाणी ग्रिन जिमचे काम कशासाठी प्रस्तावित केले? असा प्रश्न नागरीकांनी उपस्थित केला आहे. ज्याठिकाणी कोणी जात नाही असाही ठिकाणी ग्रिन जिमचे काम करण्यात आल्याने नागरीकांनी नगर पालीकेप्रती रोष व्यक्त करीत आहे.









