बस स्थानकावरील पानपोईवरून चॅटींगयुध्द

राकेश रत्नावार यांच्या वाढदिवसानिमीत्त पाणपोईचे लोकार्पण

मूल (प्रतिनिधी) : उन्हाची दाहकता वाढताच बस स्थानकावर कॉंग्रेसचे नेते राकेश रत्नावार यांच्चा वाढदिवसा निमीत्ताने त्यांनी कोसंबीच्या एका वृध्द महिलेच्या हस्ते थाटात पाणपोईचे लोकार्पण केले परंतु तिन दिवस होत नाही तर पाणपोईच्या ठिकाणी पाणी नसल्याने सोशल मिडीयावर चर्चेला उधान आले असुन पानपाईवरून चॅटीगयुध्द पाहायला मिळाले.

मूल नगर पालीकेचे माजी उपाध्यक्ष, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राकेश रत्नावार यांचा वाढदिवस 3 मे रोजी राहते, दरवर्षीच वेगवेगळे सामाजीक उपक्रम राबवुन त्यांच्या मित्र परिवाराकडुन वाढदिवस साजरा केला जातो, यावर्षी बस स्थानकावर पाण्याची व्यवस्था नसल्याने त्यांनी स्वखर्चातुन पाणपोई सुरू केले, यासाठी त्यांनी कोसंबी येथील 65 वर्षीय वृध्द महिला कमलाबाई वाढई यांच्या हस्ते पाणपोईचे थाटात लोकार्पण केला, मात्र आज तिसऱ्या दिवसी पाणपोईच्या ठिकाणी पाणी नसल्याने श्रीक्रिष्णा ग्रुपचे सदस्य संतोष चिताडे यांनी जनतेची तृष्णा संपलेली काय असा प्रश्न केला, यावर ग्रुपचे सदस्य संदिप मोहबे यांनी 10 मिनीटापुर्वीच पाणी संपले असुन त्यासाठी फोटो काढुन जनतेची तृष्णा संपलेली आहे का ? म्हणता मग सुधीरभाऊनी लाखो -करोडो रूपये खर्च करून बस स्टॉप बांधला मग तिथे साधी पाण्याची व्यवस्था सुध्दा करू शकले नाही मग तेव्हा जनतेची तृष्णा भागलेली होती असे म्हणायचे का अशा प्रती प्रश्नकरीत विकासकामातील उणिवावरून प्रश्न उपस्थित केला, यावरून मूल येथील श्रीकृष्ण ग्रुप मध्ये राजकीय चर्चेचे युध्द आज काही वेळ पाहायला मिळाले.

पाणपोई सुरू करून केवळ 3 दिवसात पाणपोई असलेल्या ठिकाणी पाणी नाही, काही कारण असु शकतो, मात्र त्यावरही पर्याय असते परंतु ओरड झाल्यानंतर पाण्याची व्यवस्था केली जाते, आधी पाण्याची व्यवस्था केली असती तर फोटो काढुन सोशल मिडीयावर टाकण्याची कुणालाही गरज पडली नसती हे तितकेच सत्य आहे.

सदर विषयाला राजकीय वळण देणाऱ्याचा सुद्धा चिताडे यांनी चांगलाच समाचार घेत राजकारण बाजुला ठेवण्याचे सुचविले . मात्र यावर सावध भुमीका घेत, ग्रूप सदस्य विवेक मुत्यलवार यांनी पाण्याची मशिन बिघडली व जो मुलागा पाणी टाकते त्याची पत्नीला दवाखान्यात नेल्याने उशिर झाल्याचे मान्य करीत फोटो काढण्यापेक्षा आपल्याकडुन 10 कॅन पाठविले असते तर काय बिघडले असते असा सवाल उपस्थित केले.

सदर चर्चेवरून मूल येथील बस स्थानकावरील असुविधेबाबातही अनेक विषयांवर चर्चेचा मोठा फाडा वाचण्याात आलेला आहे. यामुळेच तरी पाणपोईचा प्रश्न मार्गी लागेलच परंतु बस स्थानकाचे अर्थवट राहीले कामही आणि त्यामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयी काँग्रेस विचारांच्या ग्रुप सदस्यांनी मांडल्याने येणाऱ्या काळात पाणपोई सुरळीत तर चालेलच पण बसस्थानकही पुर्ण होणेही प्रवाश्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे.