चांदापूरच्या नागरीकांचा अनोखा आंदोलन

मूल (प्रतिनिधी) : तालुक्यातील चांदापूर chandapur येथील सरपंच आणि सदस्यांनी मूल पंचायत समितीमध्ये कारणे दाखवा नोटीसाचे Show cause notice खुलासा सादर केले आहे मात्र अनेक दिवस लोटुनही वरिष्ठांना पाठविण्यात मूल पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी जाणिवपुर्वक दुर्लक्ष करीत असल्याने अखेर चांदापूरच्या नागरीकांनी मूल पंचायत समितीच्या संवर्ग विकास अधिकाऱ्यांना बेशरमाच्या फुलाचे आहेर देवुन अनोखे आंदोलन movement केले.

movement
movement

मूल तालुक्यातील मौजा चांदापूर येथील सरपंच सोनी कालीदास देशमुख, soni deshmukh ग्राम पंचायत सदस्य विनोद कोहपरे, प्रफुल तिवाडे आणि श्रीमती प्रतिक्षा वामन नागापूरे यांना 7 डिसेंबर 22 रोजी शासकीय कामात गैरवर्तन केल्याच्या कारणावरून खुलासा सादर करण्याबाबत जिल्हा परिषदने Z p chandrapur त्यांना कारणे दाखवा नोटीस दिली होती, सदर नोटीसावरून आपले खुलासे पंचायत समितीकडे सादर केलेले आहे मात्र मूल पंचायत समितीच्या Mul Panchayat samiti जबाबदार अधिकाऱ्यांनी अजुनही खुलासे वरिष्ठांकडे पाठविलेले नाही, यामुळे सदर प्रकरणावरून मूल पंचायत समितीच्या जबाबदार अधिकारी कारवाईसाठी चालढकल करीत असल्याचा आरोप चांदापूरचे उपसरपंच अशोक मार्गनवार Ashok Margenwar यांनी केला आहे.

वरिष्ठांकडे खुलासे सादर न करीत असल्याने चांदापूरच्या नागरीकांनी तिव्र रोष व्यक्त करीत बुधवारी (ता. 25) रोजी मूल पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी शुक्रे यांना बेशरमाच्या फुलांचा अहेर देवुन आपली नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी चांदापूरचे नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

याबाबत मूल पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी शुक्रे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी याबाबत मला काहीही बोलाचे नाही असे उत्तर दिले.