गैरप्रकाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाने पाऊल उचलणार
आशिष कावटवार पोंभूर्णा : तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकीय कामांसह जनहिताच्या कामामध्ये गैरप्रकार झाल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. हे गैरप्रकार शोधून काढण्यासाठी तसेच ते वेळीच थांबवण्यासाठी प्रशासनाने पाऊल उचललणार असून सातारा भोसले satara bhosle gram panchayat ग्रामपंचायत मधील गैरव्यवहार व टप्प्याटप्प्याने सर्व ग्रामपंचायतींच्या कामांचे लेखापरीक्षण व चाचपणी करण्यास सुरुवात करणार असल्याचे खात्रीलायक प्रशासकीय सुत्रा कडून माहिती मिळाली आहे.
सातारा भोसले ग्रामपंचायतला साहित्य पुरवठा व ऑरो पँन्ट उपकरणांची खरेदी वादाच्या भोवऱ्यात आली आहे. ग्रामपंचायत,पंचयात समिती व जिल्हा परिषद या स्थानिक संस्थाना जेईएम पोर्टलवर (गर्व्हेमेन्ट ई मार्केट) निविदा प्रक्रिया करायची आहे.किवा वृत्तपत्र जाहिरात निविदा करायची असते परंतू तशी न करता कोटेशन द्वारे चढ्यादराने खरेदी झाल्याचे समोर आले आहे.
साहित्य खरेदी व अरो प्लांट यासाठी जीवन निरा शितल जल पोंभूर्णा, हिंदुस्थान ट्रेडर्स पोंभूर्णा, गुरूदास जनरल ॲंड सेल्स पोंभूर्णा यांनी आपले कोटेशन टाकले यात कमीदर कोटेशन असलेल्या जीवन निरा शितल जल पोंभूर्णा यांना पुरवठादाराला कंत्राट देण्यात आले खरेदी विक्रीत प्रक्रिया राबविण्यात आली आहे त्यात मोठे गैरप्रकार झाले आहे. जीवन निरा शितल जल च्या पुरवठादारानी जे कोटेशन दिले त्यातील जीएसटी GSTIN 27SRMPS1056G1ZI हि जिएसटीच मुळात बोगस व बनावट आहे. यात पुरवठादाराने ग्रामपंचायतची व शासनाची मोठी फसवणूक केली आहे. व गैरव्यवहार बाबत काही वृत्त पत्रात बातमी प्रकाशीत झाले आहे.
ग्रामपंचायतींना मिळणारा वित्त आयोगाचा निधी,प्रशासना मार्फत वितरित होणारा निधी तसेच इतर मार्गाने विकास कामांसाठी दिला जाणारा निधी, शासकीय योजनांची अंमलबजावणी याचा लेखाजोखा ग्रामपंचायत दप्तरी व्यवस्थितरीत्या ठेवला जात नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर चौकशी व तपासणी करण्याची मोहीम हाती घेण्यात येत आहे. या तपासणीमध्ये सदोष आढळलेल्याकडून खुलासे मागविले जातील. हे खुलासे समाधानकारक नसल्यास संबंधितांवर नियमानुसार कायदेशीर कारवाई प्रस्तावित केली जाणार आहे. या परीक्षणामुळे ग्रामपंचायती अंतर्गत झालेले गैरप्रकार यांना वेळीच आळा बसेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. चौकशीमुळे गैरप्रकार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. स्वत:ला वाचवण्यासाठी हा वर्ग राजकीय नेते मंडळीकडे खेटे घालत असल्याची जोरदार चर्चा रंगत आहे.
ग्रामपंचायतीतील गैरप्रकार
तालुक्यातील सातारा भोसले या ग्रामपंचायती अंतर्गत साहित्य खरेदी, वॉटर कॉन,आरो पॉन्ट,व आदी कामात झालेला गैरव्यवहार शासकीय निधीचा विनियोग कोणत्या पद्धतीने केला आहे, तसेच प्रशासकीय कामांचा लेखाजोखा कसा ठेवला आहे. याची तपासणी नियुक्त केलेले तपास अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे. त्यांनी अहवाल सादर केल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.