मेंढपाळाची समयसुचकता आली कामात, वाघ गेला पळुन tiger ran away

tiger attack
tiger attack

मूल तालुक्यातील जुनासुर्ला, चांदापूर शेतशिवरातील घटना

मूल (प्रतिनिधी) : शेंळया आणि मेंढया घेवुन चांदापूर, जुनासुर्ला Chandapur Junasurla जवळील डोंगराच्या शेजारी चराई करीत असताना बाजुला असलेल्या झुडपात पट्टेदार वाघ लपुन मेंढपाळावर हल्ला करण्याच्या तयारीत असतानाच जवळ असलेल्या दुसÚया मेंढपाळाने आरडाओरड केल्याने शेळया मेंढया सैरावैरा पडु लागले आणी वाघही पडुन गेला, मेढपाळाच्या समयसुचकतेमुळे वाघ पडुन गेल्याने अनर्थ टळला, मात्र परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले. The shepherd’s punctuality came into play, the tiger ran away

मूल तालुक्यातील मौजा जुनासुर्ला येथील मुखरु रामाजी पाटेवार आणि अतुल पाटेवार हे नेहमीप्रमाणे बुधवारी सायंकाळ 5 वाजता दरम्यान दोघे मिळुन शेळ्या मेंढ्या घेऊन पिठासूर येथील बालाजी डोंगर जुनासुर्ला आणि चांदापूर या दोन्ही गावाच्या मधील डोंगराच्या शेजारी शेळ्या मेंढ्या नेउन चारत होते. यावेळी अचानक कुत्रे भुंकायला लागल्यामुळे लांडगे वगैरे असतील म्हणून झुडपाच्या दिशेने जाऊन बघितले, असता 20 ते 25 फूट अंतरावर पट्टेदार वाघाने अतुल पाटेवारच्या मागुन झडप घेण्याच्या तयारीत असातनाच मुखरू पाटेवार या मेंढपाळाने क्षणाचाही विलंब न करता त्याने मुलाचा हात पकडून दूर अंतरावर घेऊन गेले. आणि खूप जोराने ओरडू लागले त्यामुळे संपूर्ण शेळ्या मेंढ्या बाहेर चालले आल्यात काही क्षणातच वाघ झुडपातून निघाला आणि डोंगरावर चालला गेला काळ आला, मात्र वेळ असलेली नव्हती असेच या प्रसंगावरून म्हणता येईल.

विज पडून एक महिला ठार तर एक महिला गंभीर जखमी One woman dead, one woman injured

वाघाचा बंदोबस्त करा: सरपंच रणजीत समर्थ
मागील काही दिवसांपासुन जुनासुर्ला, चांदापूर परिसरात वाघाचा धुमाकुळ सुरू आहे, मात्र वनविभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. सदर वाघाच्या हल्लात कुणाचाही नाहक जिव जाण्यापुर्वी वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी जुनासुर्लाचे सरपंच रणजित समर्थ यांनी केली आहे.